Banana Rate
Banana RateAgrowon

Banana Rate : निर्यातक्षम केळीला मागणी वाढली ; दरात वाढ

Export Quality Banana : दोन वर्षांपूर्वी केळीला अपेक्षित दर मिळाले नसल्याने केळीच्या लागवडीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे बाजारात केळीची आवक कमी आहे.
Published on

Sangli News : दोन वर्षांपूर्वी केळीला अपेक्षित दर मिळाले नसल्याने केळीच्या लागवडीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यामुळे बाजारात केळीची आवक कमी आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा केळीच्या दरात ६ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे.

निर्यातक्षम केळीला मागणी वाढली आहे. सध्या देशांतर्गत बाजारपेठेत केळीला प्रतिकिलो १४ ते १५ तर निर्यातक्षम केळीला प्रतिकिलो २५ ते २८ रुपयांचा दर मिळत असल्याने वाढत्या दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यात केळी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून सध्या ६७६ हेक्टरवर केळीचे क्षेत्र आहे. बारमाही उत्पादन असलेल्या केळीला सातत्याने मागणी असते. त्यामुळे केळीचे क्षेत्र विस्तारत आहे. गेल्या तीन वर्षांत केळीच्या क्षेत्रात घट झाली होती. त्यातही गेल्या दोन वर्षांत केळीच्या दरात सातत्याने घसरण झाली होती.

Banana Rate
Banana Export : केळीला विक्रमी ३१०० रुपये दर ; काश्मिरात पाठवणूक

त्यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड थांबवली होती. त्यानंतर बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्याने शेतकरी केळीची लागवड करण्यासाठी पुढे आले. परंतु केळीची आवक वाढल्याने दरात पुन्हा घसरण झाली होती. परंतु बाजारात केळीची मागणी वाढल्याने गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी पुन्हा केळीची लागवड केली. गतवर्षी स्थानिक बाजारपेठेत १० ते १२ रुपये किलो दर मिळाला तर निर्यातक्षम केळीस प्रतिकिलो २० ते २३ रुपये दर होता.

Banana Rate
Banana Crop Insurance : केळी विमा प्रश्न तापू लागला

जिल्ह्यातील मिरज आणि वाळवा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने केळीचे क्षेत्र अधिक आहे. केळी लागवड केल्यापासून पोषक वातावरण असल्याने केळीच्या बागा उत्तम साधल्या आहेत.

यंदाच्या हंगामातील केळीची काढणी सुरू झाली आहे. यंदा स्थानिक बाजारात केळी प्रतिकिलो १४ ते १५ रुपये तर निर्यातक्षम केळीला प्रतिकिलो २५ ते २८ रुपये दर मिळत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा केळीला चांगले दर मिळत असल्‍याने केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

तालुकानिहाय केळीचे क्षेत्र

तालुका....क्षेत्र (हेक्टरमध्ये)

मिरज...१४१

वाळवा...२५०

शिराळा...५

तासगाव...२२

खानापूर...२९

पलूस....४५

कडेगाव...२९

आटपाडी...४१

जत..७७

कवठेमहांकाळ...३६

एकूण...६७६

यंदाच्या हंगामातील केळीची काढणी सुरू झाली आहे. पहिल्यापासून केळीची निर्यात केली जात असून यंदा केळीला चांगले दर मिळत आहेत.
- प्रशांत शिंदे, केळी उत्पादक शेतकरी, आष्टा, जि. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com