Cloudy Weather Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण

बुधवारी (ता. २५) सकाळपासून गार वारा व ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. खानदेशात सध्या आगाप पेरणीचा कोरडवाहू हरभरा मळणीवर आहे.

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण (Cloudy weather) तयार झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. गारपीट किंवा वादळी पाऊस (Rain) झाल्यास मोठे नुकसान (Crop Loss) होईल, असा धसका शेतकऱ्यांमध्ये आहे.

नोव्हेंबर व डिसेंबरमध्येही अनेक दिवस ढगाळ, पावसाळी (Pauas) वातावरण होते. मागील १५ ते २० दिवसांपासून वातावरण निरभ्र, कोरडे होते.

परंतु या महिन्यातही पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाल्याने पिकांची हानी होईल, अशी भीती आहे. नोव्हेंबरमध्ये सुमारे १७ दिवस ढगाळ वातावरण होते.

यामुळे या महिन्यातही काही दिवस थंडी होती. डिसेंबरमध्येही ढगाळ वातावरण होते. काही दिवस किमान तापमान १८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

उकाडा, उष्णता तयार झाली होती. परंतु डिसेंबर अखेरीस निरभ्र वातावरण व थंडीचे आगमन झाले. या महिन्यात अनेक दिवस थंड वातावरण राहिले.

शेतकऱ्यांना आणखी थंडी कायम राहील, निरभ्र वातावरण कायम राहील, अशी अपेक्षा होती. परंतु मंगळवारी (ता. २४) पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे थंडी गायब झाली.

बुधवारी (ता. २५) सकाळपासून गार वारा व ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. खानदेशात सध्या आगाप पेरणीचा कोरडवाहू हरभरा मळणीवर आहे.

काही भागात मळणी सुरू आहे. तर काही भागात कापणी करून हरभरा मळणीचे नियोजन झाले आहे. पपईची काढणी सुरू आहे.

दादर ज्वारी निसवली आहे. तीत दाणे पक्व होत असून, या ज्वारीची वाढ १२ ते १४ फूट एवढी असते. सुसाट वारा आल्यास ही ज्वारी आडवी होईल.

तसेच कलिंगड, खरबूज, कांदा या पिकांची वाढ होत आहे. त्यात पावसामुळे किंवा ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोग येतील व नुकसानीची भीती आहे.

यामुळे भाजीपाला, फळे उत्पादकांचा कीडनाशके व इतर बाबींवरील उत्पादन खर्च वाढेल. ढगाळ वातावरण दूर झाल्यास पिकांची काढणी, वाढ यासंबंधी अडचणी येणार नाही. यामुळे शेतकरी निरभ्र, कोरड्या वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत.

केळीच्या नुकसानीची भीती...

नवती किंवा मृग बहर केळी रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा-भडगाव, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात निसवली आहे.

तिची चांगली वाढ होत आहे. परंतु अशात गारपीट किंवा वादळी पाऊस झाल्यास मोठी हानी होईल, अशी भीती, धसका शेतकऱ्यांमध्ये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT