Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : राज्यात तयार होतेय पावसाला पोषक हवामान

तापमानातील चढ-उतार कायम राहणार

Team Agrowon


पुणे : किमान तापमानात वाढ झाल्याने राज्यातील थंडी (cOLD) गायब झाली आहे. राज्याच्या तापमानातील चढ-उतार कायम राहणार आहे. तर बंगालच्या उपसागरातील प्रणालीच्या प्रभावामुळे ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम असल्याने राजस्थानातील चुरू येथे मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र थंडी कमी झाली असून, दिवसा ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. मध्य महाराष्ट्रात सोमवारी (ता.५) दुपारनंतर तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.

राज्यात किमान तापमान कमी-अधिक होत आहे. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान वाढले असून, उर्वरित राज्याच्या किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५ अंश तापमान नोंदले गेले. राज्यात ढगाळ वातावरण होऊन पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून (ता. ९) कोकणात तर शनिवारपासून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
.

...........
--चौकट--
उपसागरात आज घोंघावणार चक्रीवादळ
बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या प्रणालीची तीव्रता वाढून, पूर्व किनाऱ्यालगतच्या उपसागरात आज (ता. ७) चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहे. उद्या (ता. ८) सकाळपर्यंत ही वादळी प्रणाली उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व किनाऱ्यावर वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

........
--चौकट--
मंगळवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे ३२.२ (१७.०), जळगाव ३१.८ (१८.७), धुळे ३२.० (१५.६), कोल्हापूर ३१.१ (१९.१), महाबळेश्वर २४.७(१४.४), नाशिक ३१.३ (१८.८), निफाड ३०.८ (१७.१), सांगली ३१.४(१७.८), सातारा २९.८(१९.३), सोलापूर ३३.० (१६.७), सांताक्रूझ ३३.६(२३.४), डहाणू २८.२ (२२.६), रत्नागिरी ३५.० (२३.६), औरंगाबाद ३०.६ (१४.८), नांदेड ३२.० (१६.८), उस्मानाबाद - (१५.०), परभणी ३०.८ (१५.५), अकोला ३१.८ (१८.२), अमरावती ३२.४ (१६.७), बुलडाणा ३०.० (१७.५), ब्रह्मपुरी ३२.२ (१५.६), चंद्रपूर २९.८ (१६.४), गडचिरोली ३०.२(१३.२), गोंदिया २९.८(१३.६), नागपूर ३०.३ (१५.२), वर्धा ३१.०(१६.८), यवतमाळ ३०.५ (१८.०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CM Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार

Geo Coded Roads: सांकेतिक क्रमांक देणारे बोरी बुद्रुक पहिले

Marathwada Development: मराठवाड्याचा दुष्काळ इतिहास जमा करणार: मुख्यमंत्री

Commonwealth Startup Fellowship: कॉमनवेल्थ फेलोशिपसाठी तीन भारतीय स्टार्टअपची निवड

Mahabeej Seeds: रब्बी हंगामासाठी ‘महाबीज’चे यंदा ४ लाख क्विंटल बियाणे

SCROLL FOR NEXT