Citrus Estate Agrowon
ताज्या बातम्या

Citrus Estate : सिट्रस इस्टेट संत्रा उत्पादकांसाठी वरदान

Bachhu Kadu : मासोद येथे सिट्रस इस्टेट निर्माण होणार असून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रकल्प वरदान ठरेल.

Team Agrowon

Amravati News : मासोद येथे सिट्रस इस्टेट निर्माण होणार असून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रकल्प वरदान ठरेल. संत्रा फळबागांचे आधुनिकीकरण यातून साध्य होणार असून, संत्रा उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळेल, असा विश्‍वास दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

मासोद येथे सिट्रस इस्टेट उभारण्याबाबत मागणी माजी जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत प्रस्तावही शासनाला सादर करण्यात आला. या कामाचा कडू यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

मासोद येथील १०.१२ हेक्टर जमिनीवर सिट्रस इस्टेट निर्माण होणार असून, शासनाकडून त्याला मान्यता देण्यात आली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांना प्रकल्पाचा मोठा लाभ मिळेल, असा विश्‍वास कडू यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, की सिट्रस इस्टेटद्वारे संत्रा बागांच्या आधुनिकीकरणासह संत्रा फळपीक प्रक्रिया, संकलन, ग्रेडिंग, पॅकेजिंग, साठवण, विपणन, वाहतूक व निर्यातीला चालना मिळणार आहे.

संत्रापिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी मासोद येथील तालुका फळरोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानाधारित फळरोपवाटिका तयार करण्यात येईल. संत्र्यांच्या जातिवंत मातृवृक्षांची लागवड प्रक्षेत्रावर केली जाईल.

संत्रा पिकाच्या शास्त्रोक्त लागवड पद्धतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना उच्च दर्जाची कलमे किफायतशीर दराने उपलब्ध करून देण्यात येतील.

शेतकऱ्यांना मिळणार विविध सुविधा

सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विविध सुविधा मिळतील. अवजार बँक स्थापन करून शेतकऱ्यांना साधने, निविष्ठा उपलब्ध करून दिल्या जातील. युनिट स्थापून जैविक खत व इतर निविष्ठा शेतकऱ्यांना वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येतील.

स्थानिक गरजांनुसार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, यांत्रिकीकरण सुविधा, काढणीत्तोर व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, इंडो-इस्रायली तंत्रज्ञानाचा प्रचार आदी कामे केली जातील.

प्रकल्पाची कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी निधी मंजूर असून, काम पूर्णत्वास जाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. सिट्रस इस्टेटच्या कामांचे संनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Latest Update : मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; राज्यात मॉन्सून सरींची हजेरी

Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Women Farmers: भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल

Sugarcane Crop Protection: उसात वाढतोय जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT