Citrus Estate : सिट्रस इस्टेट’साठी आणखी १७ कोटी २२ लाखांची मागणी

Mosambi Cultivation: २२ कोटी ३३ लाख रुपये प्राप्त; पालकमंत्र्यांकडून आढावा
Orange
OrangeAgrowon
Published on
Updated on

Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ३९ कोटी ५५ लाख ६३ हजार रुपये खर्चाच्या ‘सिट्रस इस्टेट’साठी आजवर २२ कोटी ३३ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. आणखी १७ कोटी २२ लाख ३५ हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

पैठण तालुक्यातील इसारवाडी परिसरात २२.५० हेक्टर क्षेत्रावर सिट्रस इस्टेट उभे राहणार आहे. यामध्ये साडेचार हेक्‍टरवर मोसंबीचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (Center of Excellence) व इतर १८ हेक्टर क्षेत्रावर इतर आवश्यक बाबींची उभारणी होईल. भूमिपूजनानंतर ‘सिट्रस इस्टेट’च्या प्रगतीचा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी (ता. १०) रामितीमध्ये आढावा घेतला.

प्राप्त निधीपैकी १८ कोटी ९५ लाख ३९ हजार रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केले आहेत. या विभागाने संरक्षक भिंतींसह आवश्यक इमारत उभारणीच्या कामाची प्रक्रिया सुरू केली आहे. आढावा बैठकीत मंजूर अत्यावश्यक पदे भरण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. याशिवाय कार्यक्षेत्रातील मोसंबी उत्पादकांची १ हजार सभासद शुल्क भरून त्यांना ‘सिट्रस इस्टेट’चे सभासद करून घेण्यासाठी फलोत्पादन तांत्रिक सहाय्यक ही कंत्राटी पदे भरणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. याशिवाय कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या सेवा घेण्यासंदर्भात निर्णय झाला.

Orange
Citrus Estate : पैठणमध्ये सिट्रस इस्टेट उभारणार ः मंत्री भुमरे

मातृवृक्ष लागवडीची तयारी करण्यासाठी नागपूरच्या सिट्रस सेंटरला ७५० मातृवृक्ष रोपांची मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी रोपे पुरविण्यात असमर्थता दर्शविल्याची माहिती माहिती देण्यात आली. त्यावर पर्यायांची चाचपणी बैठकीत करण्यात आली. या वेळी फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, विभागीय कृषी सहसंचालक आर. टी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री जाधव, अशोक येरेकर, राजेंद्र बोरकर, तज्ज्ञ संचालक डॉ. भगवानराव कापसे, नंदलाल काळे, ‘सिट्रस

Orange
Citrus Estate : ‘सिट्रस इस्टेट’चे आज भूमिपूजन

मराठवाड्यातील मोसंबी उत्पादकांसाठी ‘सिट्रस इस्टेट’ महत्त्वपूर्ण ठरेल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. भूमिपूजननंतर त्याच्या एकूणच प्रगतीचा आढावा आपण घेतला. सव्वा वर्षात ‘सिट्रस इस्टेट’ची संपूर्ण उभारणी होण्यासाठी काम करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या आहेत.

- संदीपान भुमरे, पालकमंत्री,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com