Electricity
Electricity Agrowon
ताज्या बातम्या

Mahavitaran Strike : मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता राहिले ‘ऑन फिल्ड’

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता (Chief Engineer) सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता प्रकाश जमधडे, प्रवीण दरोली, संजय सरग यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते हे बुधवारी (ता.४)‘ऑन फिल्ड’ राहिले.

महावितरणच्या (Mahavitaran) माहितीनुसार, विभाग ते परिमंडलस्तरीय नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्क ठेवून कोणत्याही कारणास्तव खंडित झालेला वीजपुरवठा (Power Supply) सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली होती. यासोबतच महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी व उपकेंद्रांशी समन्वय ठेवण्यात येत होता.

प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणीपुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात आली. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्याचे नियोजन होते.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने संप पुकारला होता. त्यामुळे औरंगाबाद परिमंडलात आपत्कालीन व्यवस्था तयार ठेवण्यात आली होती. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज राहिले. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले होते.

विभागासह मंडल व परिमंडल स्तरावर २४ तास सुरू राहणारे नियंत्रण कक्ष सुरू राहिले. पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्याचे नियोजन होते.

संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी, महावितरणचे ॲप्रेंटिस, विद्युत सहायक, प्रशिक्षणार्थी अभियंता, देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या निवड सूचीवरील कंत्राटदारांचे कर्मचारी यांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्त्या केल्या होत्या.

सेवानिवृत्त विद्युत अभियंता व तांत्रिक कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालयामधील विद्युत अभियंता व कर्मचारी यांच्याशी संपर्क केला होता.

सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे ही पूर्वतयारी महावितरणच्या कामी आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT