Tomato Rate Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Rate : इथं मिळतोय अर्ध्या भावात टोमॅटो ; किलोला दर आहेत....

Tomato Market Rate : महिन्यात अवघ्या तीन ते पाच रुपये किलोने शेतकऱ्यांना टोमॅटो विकाला लागला होता. मात्र, सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्याचे चित्र आहे.

Mahesh Gaikwad

Tomato Rate India : देशभरात टोमॅटोचे दर अचानक तेजीत आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यात अवघ्या तीन ते पाच रुपये किलोने शेतकऱ्यांना टोमॅटो विकाला लागला होता.

मात्र, सध्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारातील दर वाढल्याने परिणामी शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळत आहे. देशभरातील बाजारात टोमॅटोच्या दराची हीच स्थिती दिसत आहे.

टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अशातच तामिनाडूतील नागरिकांना टोमॅटोच्या दरात काही अंशी दिलासा मिळणार आहे. एकीकडे देशभरातील किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर १०० रुपयांवर गेलेल असताना तामिळनाडूतील नागरिकांना मात्र ६८ रुपये प्रतिकिलोने टोमॅटो खरेदी करता येणार आहे.

तामिळनाडूतील नागरिकांना टोमॅटोच्या वाढत्या दरांपासून दिलासा देण्यासाठी थेट फार्म फ्रेश आउटलेट्सवर (एफएफओ) टोमॅटोची विक्री केली जाणार आहे. या एफएफओवर ६८ रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटोची विक्री केली जाणार आहे.

याशिवाय हे दर आणखी कमी करून ते ६० रुपयांवर आणण्यासाठीही महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत, अशी माहिती तामिळनाडूचे सहकार आणि अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री पेरियाकुरप्पन यांनी दिली आहे.

टोमॅटोचे दर वाढीची कारणे

मे महिन्यामध्ये उष्ण वातावरणामुळे प्रमुख उत्पादक राज्यांत टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यातच बिपरजॉय चक्रिवादळामुळे राजस्थान आणि गुजरात या राज्यांसह इतर राज्यातही टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. परिणामी बाजारातील टोमॅटोची आवक घटल्याने मागील आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात तेजी आल्याचे चित्र आहे.

दरम्यान, देशातील अनेक भागांमध्ये पावसामुळे टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतातच पीक खराब होत असल्याने बाजारात कमी प्रमाणात मालाची आवक होत आहे. ज्यामुळे बाजारात टोमॅटोच्या दरात तेजी आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT