Tomato Price : टोमॅटोचे भाव गगनाला!

Team Agrowon

टोमॅटोचे भाव तेजीत

मे महिन्यात शेतकऱ्यांना अवघ्या ३ ते ५ रुपये किलोने विकाव्या लागलेल्या टोमॅटोच्या भावात मोठी तेजी आली आहे.

Tomato Market | Agrowon

पुरवठा कमी

टोमॅटोला भाव मिळणारच नाही, असं मानून अनेक भागातील शेतकऱ्यांनी पिकाला खत द्यायचं बंद केलं. यामुळे बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी होत गेला.

Tomato Market | Agrowon

टोमॅटो पिकाला फटका

गेले काही आठवड्यांमध्ये महत्वाच्या टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये उष्णता जास्त होती. अनेक भागात उष्णतेची लाट होती त्यामुळे भजीपाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला

Tomato Market | Agrowon

आवक कमी,मागणी जास्त

बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात राज्यांमध्ये टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.

Tomato Market | Agrowon

घाऊक विक्रीचे दर जास्त

देशभरातील बाजारात टोमॅटोचे घाऊख विक्रीचे दर आता ६० ते ७० रुपये प्रतिकिलोवर पोहचले.दिल्ली आणि बंगळूरु बाजारात टोमॅटो १०० ते १२० रुपयांवर पोहचला.

Tomato Market | Agrowon

विक्रीचे भाव गगनाला

राज्यातील बाजारात सध्या शेतकऱ्यांना सरासरी प्रतिक्विंटल ६ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. तर किरकोळ विक्रीचे भाव ८० ते १०० रुपयांवर पोचले.

Tomato Market | Agrowon

भाव टिकण्याचा अंदाज

टोमॅटो भावात झालेली वाढ पुढील काळातही कायम राहू शकते, असा अंदाज आहे. पुढील दोन महिने तरी बाजारात तेजी राहील, असे व्यापारी सांगत आहेत.

Tomato Market | Agrowon
Tomato Market | Agrowon