Chandrayaan-3  Agrowon
ताज्या बातम्या

Chandrayaan-3 : चांद्रयान 3 चंद्राच्या शेवटच्या कक्षेत; लँडर आज वेगळा होणार

Chandrayaan-3 Latest Update: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3 चं प्रक्षेपण करून महिना झाला. आता हे यान अतिशय महत्त्वाच्या वळणावर पोहोचले आहे.

Team Agrowon

ISRO Chandrayan 3 : भारताची महत्त्वाकांक्षी आणि सर्व जगाचे लक्ष वेधलेली चांद्रयान-३ मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यानाने बुधवारी (ता. १६) सकाळी साडेआठच्या सुमारास चंद्राच्या शेवटच्या कक्षेत प्रवेश केला. आता सर्व कक्षा बदल पूर्ण झाले असून यान चंद्रावर उतरविण्याची तयारी ‘इस्रो’त सुरू झाली आहे.

यान चंद्रापासून १५३x१६३ किलोमीटर अंतरावरील कक्षेत आहे. बुधवारी (ता. १६) चंद्राच्या शेवटच्या कक्षेत स्थापन करण्यास यश आले असून या लहान कक्षेतील परिभ्रमणानंतर प्रपोल्शन मोड्युल आणि लँडर मोड्युल विभक्त करण्याचा टप्पा सुरू होणार आहे,’’असे ट्विट भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केले आहे.

नियोजनानुसार गुरुवारी (ता. १७) मुख्य यानापासून लँडर वेगळा केला जाणार आहे. यावेळी दोन्ही मोड्युल चंद्राच्या चारही बाजूंनी १००x१०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत असतील. गुरुवारी दुपारी पावणेचार ते चार या वेळेत लँडर वेगळा होईल. यानंतर २३ ऑगस्टला लँडर चंद्राच्या दक्षिण गोलार्धात उतरणार आहे.

‘इस्रो’ची खबरदारी

चंद्राच्या पृष्ठभागावर यान अलगदपणे उतरल्यास भारतासाठी ती अत्यंत गौरवास्पद कामगिरी ठरेल. अशी कामगिरी करणारे अमेरिका, रशिया, चीन या देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळणार आहे. यान चंद्रावर अलगद आणि सुरक्षितपणे उतरण्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे. यानाच्या रचनेत अनेक इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक उपप्रणालींचा समावेश केलेला आहे. दिशादर्शन आणि नियंत्रण प्रणाली, प्रपोल्शन प्रणाली आणि संचार संवेदक आदींचा समावेश त्यात आहे. रोव्हर वेगळा करण्यासाठी प्रणाली, दोन्ही बाजूंकडून दळणवळणासाठी अँटेना आणि यानातील इतर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : सातारा जिल्ह्यात १ लाख शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार

Delhi Farmers Meeting : ‘दिल्ली’ने ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Rabi Crop Seminar : संकटाच्या स्थितीत कृषी विभाग, कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसोबत; रब्बी पीक परिसंवादात तज्ज्ञांचा दिलासा

Chimur Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी चिमूरमध्ये आक्रोश मोर्चा

Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

SCROLL FOR NEXT