Monsoon Rain Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Rain : पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप

Monsoon Return : हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश भागात आज कोरडं हवामान राहण्याचा तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे.

Dhananjay Sanap

Monsoon Update : मागील दोन दिवसांपासून राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली आहे. हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश भागात आज कोरडं हवामान राहण्याचा तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे. तसेच राज्यात पुढील पाच दिवस मुख्यत पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कोरड्या हवामानासह तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून राज्यात उन्हाचा चटका अजून वाढेल असा अंदाजही हवामान विभागाने जाहीर केला आहे. 

बुधवारी  मॉन्सूनच्या परतीची सीमा जैसे थे आहे. मंगळवारी मॉन्सूननं उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह उर्वरित राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं.

बुधवारी मॉन्सूनच्या परतीच्या सीमा गुलमार्ग, धरमशाला, मुक्तेश्वर, पीलीभीट, ओराई, अशोकनगर, इंदोर, बडोदा, पोरबंदर भागातच आहे.  पुढील २ ते ३ दिवसांत मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान असून पूर्व उत्तराखंड, पूर्व मध्यप्रदेश आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागातून मॉन्सून माघार घेण्याची शक्यत हवामान विभागाने वर्तवली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT