Weather Update Agrowon
ताज्या बातम्या

Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी (Mandous Cyclone) प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात वादळी पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. राज्याच्या किमान तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता. ११) धुळे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारात यंदाच्या हंगामातील नीचांकी १० अंश तापमानाची नोंद झाली. आज (ता. १२) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी - अधिक होत आहे. राजस्थानामधील चूरू येथे रविवारी (ता. ११) देशाच्या सपाट भू-भागावरील सर्वांत नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. ५.५ अंशांपर्यंत खाली घसरलेला पारा पुन्हा १० अंशांपार पोचला आहे. तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या बहुतांशी भागात रविवारी ढगाळ वातावरण झाले. आज (ता. १२) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तुरळक पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्राची शक्यता

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ निवळल्यानंतर केरळ, तमिळनाडू, कर्नाटकमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली अरबी समुद्रात येताच उद्या (ता. १३) पुन्हा कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली किनाऱ्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे.

वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर पुणे, सातारा, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

International Agriculture Facility Centre: आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी ५०० कोटींची शिफारस

Heavy Rainfall Compensation: अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी ६५ कोटी वितरणास मंजुरी

Subsidy Scam: कृषी आयुक्तालयाने ‘एसएओ’ला विचारला जाब

Crop Production Decrease: ‘एल निनो’मुळे खरिपात उत्पादन घटणार?

US China Trade: अमेरिकेकडून अधिक शेतीमाल खरेदीस चीनचा होकार; व्हाइट हाउसची माहिती

SCROLL FOR NEXT