Chana Market Agrowon
ताज्या बातम्या

Chana Harvesting : हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत

हरभऱ्याला चांगले दर मिळत असल्याने मागील काही वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

Team Agrowon

Chana Market Update पुणे ः रब्बी हंगामात (Rabi Season) उशिराने पोषक हवामान तयार झाल्यानंतर पुणे विभागातील अनेक शेतकऱ्यांनी हरभरा (Chana Crop) पिकाला पसंती दिली.

सध्या पिके काढणीच्या (Chana Harvesting) अवस्थेत असून, अनेक ठिकाणी पिके पक्व होत आहे. पुढील आठवड्यापासून काढणीला सुरुवात होईल, असे कृषी विभागाच्या (Agriculture Department) सूत्रांनी सांगितले.

उशिराने थंडी वाढल्याने हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पुणे विभागात सरासरीच्या एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी दोन लाख २७ हजार ३७४ हेक्टर म्हणजेच १२५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

यात नगर, सोलापूर जिल्ह्यांत चांगलीच वाढ झाली असून पेरण्या झालेल्या ठिकाणी घाटे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे. विभागात सरासरीच्या तुलनेत ४५ हजार २५५ हेक्टरने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याने उत्पादनातही काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

हरभऱ्याला चांगले दर मिळत असल्याने मागील काही वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत. विभागात हरभऱ्यांचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. यंदाही शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकांमध्ये कृषी विद्यापीठाकडील विविध वाणांच्या हरभऱ्याची पेरणी केली आहे. यंदा पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असताना हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन पेरणी केली आहे.

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी २६ हजार ३०० हेक्टर म्हणजेच १५५ टक्के पेरणी झाली आहे.

तर दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे. तर पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात १० हजार ४९ हेक्टरपैकी सुमारे १२ हजार ६८८ हेक्टर म्हणजेच १२६ टक्के पेरणी झाली आहे.

तर पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, राहुरी, अकोले, श्रीरामपूर या तालुक्यांत १०० टक्केहून अधिक तर कर्जत, शेवगाव, नेवासा, संगमनेर, कोपरगाव, राहाता या तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या ६ हजार ३७३ हेक्टरपैकी ५ हजार २९१ हेक्टर म्हणजेच ८३ टक्के पेरणी झाली आहे.

तर उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकांची पेरणी, हेक्टरमध्ये ः

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के

नगर --- ८८,३७७ -- १,०९,१०० -- १२३

पुणे -- ३४,३३० -- २५,५८५ -- ७५

सोलापूर -- ५९,४१२ -- ९२,६८९ -- १५६

एकूण -- १,८२,११९ -- २,२७,३७४ -- १२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT