Rahul Gandhi  Agrowon
ताज्या बातम्या

Rahul Gandhi : लुधियानातील उद्योगांना केंद्राचे सहकार्य नाही ः राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान आज केंद्रावर पुन्हा हल्ला चढविला. पुरेसे सहकार्य केल्यास पंजाबमधील लुधियानातील लघु व मध्यम उद्योग चीनशी स्पर्धा करू शकतात.

Team Agrowon

लुधियाना (वृत्तसंस्था) ः काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul Gandhi) यांनी ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) आज केंद्रावर पुन्हा हल्ला चढविला. पुरेसे सहकार्य केल्यास पंजाबमधील लुधियानातील लघु व मध्यम उद्योग (MSME Industry) चीनशी स्पर्धा करू शकतात. मात्र, पंजाब सरकार आणि केंद्र सरकार येथील उद्योगांना सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ते सभेला संबोधित करताना बोलत होते. भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. लुधियाना पंजाबची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

भाजपवर प्रहार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे देशात द्वेष, हिंसा व भीतीचे वातावरण पसरविले जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी पुन्हा केला. ते म्हणाले, की देशात द्वेष आणि हिंसाचाराला कसलेही स्थान असता कामा नये. हा बंधुत्व, प्रेम आणि आदर दिला जाणारा देश आहे. नोटाबंदीवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला.

ते यासंदर्भात म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्याने लुधियानासह देशातील लघु व मध्यम उद्योगांवर विपरीत परिणाम झाला. नोटाबंदी आणि चुकीचा जीएसटी ही धोरणेच नाहीत तर लघु व मध्यम उद्योग संपविण्याची ती शस्त्रे आहेत, हे सत्य आहे.

देशातील अब्जपती रोजगार देऊ शकत नाहीत, मात्र लुधियानातील लघु व मध्यम उद्योग देशाला रोजगार देऊ शकतात. त्यामुळे, या उद्योगांना सहकार्य करून त्यांना बळ दिल्यास लुधियाना चीनशी स्पर्धा करू शकते. मात्र, पंजाब सरकारसह केंद्र सरकारकडे कसलीही दूरदृष्टी नसल्याने येथील उद्योगांना यांच्यापैकी कुणीही सहकार्य करत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

यात्रेला दोरहामधून पुन्हा सुरुवात

‘भारत जोडो’ यात्रा गुरुवारी पंजाबमधील दोरहामधून पुन्हा सुरू झाली. यावेळी स्थानिक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले. त्याचप्रमाणे, काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रध्वज घेऊन यात्रेत चालत होते.

फतेगड साहिबमधील सिरहिंदपासून ‘भारत जोडो’चा पंजाबमधील टप्पा बुधवारी(ता.११) सुरू झाला होता. नियोजनानुसार यात्रा पंजाबमध्ये लुधियाना, गोरया, जालंधर, दासूयामार्गे जाणार आहे. काँग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वॉरिंग, माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आदीही यात्रेत सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT