Cashew Processing
Cashew Processing  Agrowon
ताज्या बातम्या

Cashew Market Price : आवक वाढल्यामु‌ळे काजूचे दर घसरले ; उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती

Team Agrowon

Cashew Market Rate : मागील दोन महिन्यापासून राज्यात होणाऱ्या वादळी पावसाने काजू उत्पादकांना मोठा तडाखा बसल्याने आधीच निर्सगाच्या फेऱ्यात अडकलेल्या काजू उत्पादकांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या काजूचे दर कमी झाल्याने तोटा सहन करावा लागत आहे.

 दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादकांचा खर्चही निघत नाहीत.

गेल्या वर्षी, W320 ग्रेड काजूची निर्यात प्रति टन २ हजार ९५० - ३ हजार १००० डाॅलर मिळाली होती आणि ती २ हजार ५०० - २ हजार ६०० डाॅलरवर आली आहे. पण सध्या कच्च्या काजूच्या किमती १ हजार २०० डाॅलर प्रति टन आहेत. मागील वर्ष घटत्या निर्यातीमुळे आव्हानात्मक होते. यंदाही कच्च्या काजूचा पुरवठा वाढल्याने आणि कमी मागणीमुळे निर्यातीच्या किमती घसरल्यामुळे चालू वर्षात परिस्थिती आणखी बिकट होण्याची तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

नटकिंग ब्रँडचे मालक असलेल्या बीटा ग्रुपचे अध्यक्ष जे. राजमोहन पिल्लई यांनी सांगितले की, ऊर्जा आणि अन्न संकटामुळे जागतिक स्तरावर महागाई वाढली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या खर्चावर परिणाम झाला आहे. काजूवर खर्च कमी केल्याने जागतिक स्तरावर मागणी घटली आहे, ज्यामुळे किमती वाढणे कठीण झाले आहे.

आकडेवारीनुसार पिल्लई म्हणाले की कच्च्या काजूचे जागतिक उत्पादन २०१४ मध्ये २.९३ दशलक्ष टनांवरून २०२२ मध्ये ३.७१ दशलक्ष टन झाले आहे आणि ते ४.४१ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मागणी आणि पुरवठा बरोबरीने होत नसल्याने उद्योगाची ही स्थिती निर्माण झाली आहे.

2023 च्या दुसऱ्या सहामाहीत मागणी वाढल्यास किमती थोड्या प्रमाणात वाढीच्या अपेक्षा आहेत. 2022 च्या उत्तरार्धात काही प्रमुख आयात करणार्‍या देशांमध्ये (यूएस आणि ईयू) खप कमी झाला. त्याच वेळी, भारतातील खप वाढ होता आणि 2023 मध्ये हा ट्रेंड कायम राहील अशी अपेक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

Condensing Economizer : बायोगॅस ज्वलनातून मिळेल शुद्ध पाणी

Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Onion Export Ban : संवेदनशील कांदा, असंवेदनशील राज्यकर्ते

Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूर ७१ तर हातकणंगलेमध्ये ६८ टक्के चुरशीने मतदान

SCROLL FOR NEXT