Soybean Crop  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean : कणेरी कृषी विज्ञान केंद्रातर्फे १२५ एकरांवर सोयाबीन प्रात्यक्षिके

पीक प्रात्यक्षिक-गळीत धान्यअंतर्गत सोयाबीन पिकाचे प्रात्यक्षिके कणेरी, कोगील बुद्रुक, द. वडगाव व व्हन्नूर या गावांमध्ये एकूण १२५ एकरावर राबविण्यात आले.

टीम ॲग्रोवन

कोल्हापूर : कणेरी (ता. करवीर) येथील श्री. सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र (KVK) यांच्यामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०२२-२३ अंतर्गत समूह आद्यरेखा पीक प्रात्यक्षिक-गळीत धान्यअंतर्गत सोयाबीन पिकाचे (Soybean Crop) प्रात्यक्षिके कणेरी, कोगील बुद्रुक, द. वडगाव व व्हन्नूर या गावांमध्ये एकूण १२५ एकरावर राबविण्यात आले.

सोयाबीनच्या विविध वाणांचे प्रदर्शन व पीक स्पर्धेचे आयोजन दर्याचे वडगाव (ता. करवीर) येथे नुकतेच झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह, द. वडगावचे सरपंच अनिल मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांची सविस्तर माहिती ‘केव्हीके’चे पांडुरंग काळे यांनी दिली. कार्यक्रमादरम्यान माऊली ड्रोन सर्व्हिसेसद्वारे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान आयोजित सोयाबीन पीक स्पर्धेमध्ये कणेरी, कोगील बुद्रुक, द. वडगाव व व्हन्नूर या गावांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांद्वारे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची पाहणी करून यामध्ये फुले संगम, फुले किमया व कमी कालावधीच्या सोयाबीनचे गट करून त्यामधून शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.

फुले संगममध्ये महावीर किणीकर, नागनाथ बेणले, महादेव बामणकर, फुले किमया वाणात प्रथम आदिनाथ किणीकर, मधुकर बोडके, पांडूरंग जोशिलकर, इतर वाणात शिवाजी जाधव, द्वितीय संभाजी पाटील, राजेंद्र निकम. आदी शेतकऱ्यांनी बक्षीस मिळवले. राजेंद्र वावरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कुमार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT