Farmers Producers  Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Producer Company: शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे तंत्र पोहोचवा ः झेंडे

‘आज बाजारात जे विकते ते पिकवावे. सोबतच घरच्या घरी निविष्ठा तयार करून उत्पादन खर्चात कशा पद्धतीने बचत होऊ शकते.

Team Agrowon

अकोला ः ‘‘आज बाजारात जे विकते ते पिकवावे. सोबतच घरच्या घरी निविष्ठा तयार करून उत्पादन खर्चात कशा पद्धतीने बचत होऊ शकते, या तंत्राची माहिती शेतकरी उत्पादक (Farmers Producers Company) कंपनीने अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी,’’ अशा सूचना राज्याच्या कृषी आयुक्तालयातील निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांनी व्यक्त केली. जानेफळ येथे विदर्भ समृद्धी कृषी उत्पादक शेतकरी कंपनीला त्यांनी भेट देऊन आढावा घेतला. या वेळी ते बोलत होते.

सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एन. डाबरे, मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी ए. के. मिसाळ, तालुका कृषी अधिकारी के. एस. काळे, लोणार तालुका कृषी अधिकारी व्ही. पी. सरोदे, तुळजाई शेतकरी कंपनीचे अध्यक्ष डॉ. केशवराव अवचार,

विदर्भ समृद्धी कृषी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संतोष साखरे, उपाध्यक्ष मोहन धोटे, सचिव अमोल माडोकर, संचालक मोहन जी. धोटे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी पी. एन. गाडेकर, कृषी पर्यवेक्षक डी. जी. वायाळ, कृषी सहायक डी. ए. जाधव, पी. एस. अंभोरे, आर. डी. झोरे, पी. एस. देवकर, जी. ए. चव्हाण, डी. एल. देशमुख आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. झेंडे यांनी कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला. या भागात रब्बीत गहू, हरभरा या पिकांसोबतच मोहरी, जवस व इतर पिकांचे क्षेत्र वाढीसोबत प्रयत्न करण्याबाबत सुचवले. या पिकांना बाजारात मागणी असून शेतकऱ्यांनाही पर्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT