Organic Farming Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : जैविक घटक हे शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे

Sustainable Agriculture : जैविक कीडनाशके पर्यावरणदृष्ट्या व सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टिकोनातून त्यांची टिकवण क्षमता, गुणवत्ता आणि अनुवंशिक शुद्धता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

Team Agrowon

Pune News : जैविक कीडनाशके पर्यावरणदृष्ट्या व सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने महत्त्वाची भूमिका बजावतात. या दृष्टिकोनातून त्यांची टिकवण क्षमता, गुणवत्ता आणि अनुवंशिक शुद्धता यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

यासाठी सार्वजनिक व खासगी भागीदारीद्वारे संशोधन व उत्पादन घेणे आवश्यक आहे. जैविक घटक हे पर्यावरणपूरक व शाश्वत शेतीसाठी महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक पीकशास्त्र डॉ. टी. आर. शर्मा यांनी केले.

बेंगळुरू येथील भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय कृषी कीटक संसाधन ब्युरो आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय समन्वित जैविक कीड नियंत्रण प्रकल्पाच्या दोन दिवसीय ३२ व्या वार्षिक आढावा बैठकीचे उद्घाटन येथील कृषी महाविद्यालयात झाले.

प्रमुख मार्गदर्शन करताना भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक पीकशास्त्र डॉ. शर्मा ऑनलाइन उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे पीक संरक्षणाचे साहाय्यक महासंचालक डॉ. एस. सी. दुबे, संशोधन संचालक डॉ. एस. डी. गोरंटीवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी. एस. पाटील, डॉ. एस. एन. सुशील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. बी. ए. बढे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील म्हणाले, ‘‘कीटकांच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली तर पर्यावरणदृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या हानिकारक असते.

शेतीच्या शाश्वत उत्पादनासाठी जैविक घटकांचा अधिकाधिक वापर होणे गरजेचे आहे. उपयुक्त कीटक हे उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी स्थानिक जैविक घटकांची ओळख, त्यांचे उत्पादन व त्यांचे शेतकऱ्यांपर्यंत वितरण होणे आवश्यक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे यावर्षी १०० टन जैविक कीडनाशकांचे उत्पादन केले आहे.’’

डॉ. दुबे म्हणाले, की जैविक कीडनाशके हे वापरण्यासाठी फार सोपी, सुरक्षित व कमी खर्चीक असतात. यामुळे शाश्वत उत्पादनासाठी व सेंद्रिय शेतीसाठी जैविक कीडनाशकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यशाळेला देशभरातून १३ राज्यांतून ७० शास्त्रज्ञ सहभागी झालेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT