Sugarcane Crushing Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Factory : भीमाशंकर चे गाळप पुणे जिल्ह्यात आघाडीवर

Team Agrowon

आंबेगाव : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे (Bhimashankar Co-operative Sugar Factory) संस्थापक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत झालेल्या गाळप हंगामात एकाच दिवशी (ता.२५) उच्चांकी ८०७० टन गाळप व उच्चांकी १०,००० क्विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

गाळप हंगाम २०२०-२१ पूर्वी कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कारखान्याची गाळप क्षमता २५०० टनावरून ६००० टन विस्तारीकरणाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. तर, गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये उच्चांकी ११ लाख ८६ हजार ४२६ टन गाळप केले आहे. गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये २६ डिसेंबर २०२२ अखेर ४ लाख २२ हजार ६९० टन गाळप करून सरासरी १०.८० टक्के उताऱ्याने ४ लाख ५१ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

कारखान्याचा सरासरी साखर उतारा १०.८० टक्के हा पुणे जिल्ह्यामध्ये सद्यःस्थितीत सर्वोच्च आहे. कारखाना सहवीज प्रकल्पातून २ कोटी ४९ लाख १९ हजार ४०० युनिट वीज उत्पादन केले आहे. असे असूनही कारखाना वापर वजा जाता वीज वितरण कंपनीस १ कोटी ३२ लाख ५७ हजार ८४० युनिट वीज निर्यात केली आहे.

‘संपूर्ण उसाचे गाळप वेळेत करणार’
कारखान्याकडे ऊस नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याचे काम तोडणी ठरविल्याप्रमाणे चालू असून संपूर्ण उसाचे गाळप वेळेत करण्याचे नियोजन केले आहे. तरी आपला संपूर्ण ऊस भीमाशंकर कारखान्यास देवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT