Cold Ripening Benefits Agrowon
ताज्या बातम्या

Mango Cashew : सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा आंबा, काजूला फायदा

थंडीमध्ये विविध कीडरोग सक्रिय नसतात. त्याचा चांगला परिणाम आंबा, काजू पिकांवर होतो; मात्र फळधारणा झालेल्या आंबा पिकाला काही अंशी धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

Team Agrowon

सिंधुदुर्गनगरी ः गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू असलेली थंडी (Cold Weather) जिल्हयात कायम आहे. या थंडीचा फायदा आंबा, (Mango) काजू (Cashew) या पिकांना होणार असला तरी काही प्रमाणात फळधारणा झालेल्या आंबा पिकाला थंडी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ९ जानेवारीपासून थंडीचा कडाका सुरू आहे. जिल्ह्यातील तापमान कधी नव्हे एवढे घसरले आहे. १० अंश सेस्लिअसपर्यंत तापमान आले होते.

त्यामध्ये चढउतार पाहायला मिळत असला तरी सातत्याने सहा-सात दिवस १३ अंश सेस्लिअसच्या आतमध्ये तापमान राहिले आहे. त्यामुळे या थंडीचा फायदा मोहर न आलेल्या, मोहर स्थितीत असलेल्या आंबा, काजू पिकांना होणार आहे.

थंडीमध्ये विविध कीडरोग सक्रिय नसतात. त्याचा चांगला परिणाम आंबा, काजू पिकांवर होतो; मात्र फळधारणा झालेल्या आंबा पिकाला काही अंशी धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

या थंडीमुळे फळे असलेल्या झाडांना पुन्हा पालवी आणि मोहर येण्याची शक्यता असते. तसे झाल्यास पूर्वी आलेल्या फळांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.

त्यामुळे थंडीच्या फायद्यासोबत काहीअंशी तोटेदेखील जाणवण्याची शक्यता आहे. १५ टक्के झाडे सध्या फळधारणा झालेली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Deficit : सप्टेंबरमध्ये तीन वर्षांनंतर सरासरीपेक्षा कमी पाऊस

Niphad Drought : निफाड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून उपाययोजना, सवलती लागू करा

Zilla Parishad : ‘जि. प.’ने दुष्काळासाठी विशेष सभा घ्यावी

Farmers Demand: उसाला ६५०० रुपये दर जाहीर करा

Maharashtra Rainfall : ५६ महसूल मंडलांत निम्म्याहून कमी पाऊस

SCROLL FOR NEXT