Supriya Sule  Agrowon
ताज्या बातम्या

Supriya Sule : बॅंक घोटाळे, आर्थिक फसवणुकीतील सर्वसामान्यांचे पैसे लवकर मिळावेत

खासदार सुळे यांची केंद्र सरकारकडे मागणी

Team Agrowon

बारामती, जि. पुणे ः ‘‘बॅंक घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीच्या व्यवहारातील गुन्हेगारांना अटक करण्यापेक्षा, सर्वसामान्यांचे बुडालेले पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने मालमत्तांचा वेगाने लिलाव करून ते परत करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत,’’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

मंगळवारी (ता.२७) माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘याबाबत संसदेत मी भूमिका मांडली आहे. बुडीत बँकांबाबत जेव्हा फसवणुकीचा प्रकार घडतो, तेव्हा संबंधितांना अटक होते, ती व्यक्ती तुरुंगात जाते. मात्र त्याच्या मालमत्तांचा वेगाने लिलाव होत नाही. अनेकदा या मालमत्ता लोक घेत नाही, पर्यायाने ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा सर्वसामान्यांचे पैसेही मात्र अडकून राहतात.’’

खासदार सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘‘या संदर्भात मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे, की बॅंक घोटाळ्यातील अधिकारी, संचालकांना अटक करणे न करणे हा कायद्याचा विषय आहे, मात्र यात पहिले काम त्यांच्या मालमत्ता विकल्या गेल्या पाहिजेत, ते विकून ठेवीदार व गुंतवणूकदारांना पहिल्यांदा पैसे दिले गेले पाहिजेत. ही प्रक्रिया क्लिष्ट व लांबलचक आहे, ती सुटसुटीत केली पाहिजे. ही बाब अर्थमंत्री सीतारामन यांनी मान्य केली असल्याने मी त्यांचे आभार मानते. याबाबत त्या लवकरच काही निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे.’’


आगामी अधिवेशनात केंद्राकडे जप्त केलेल्या मालमत्ता विकून किती निधी आला आहे आणि या मालमत्ता विकून सामान्यांचे पैसे का परत दिले जात नाहीत, या बाबत मी प्रश्‍न उपस्थित करणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT