Banana Market Agrowon
ताज्या बातम्या

Banana Market : गणेशोत्सवामुळे केळीचे दर वाढले

Banana Market Update : देशात केळीची टंचाई निर्माण झाली आहे. आवक कमी झालेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात केळीच्या दरात वाढ झालेली आहे.

Team Agrowon

Nagpur News : देशात केळीची टंचाई निर्माण झाली आहे. आवक कमी झालेली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात केळीच्या दरात वाढ झालेली आहे. सण आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पाच दिवसांत केळीच्या दरात प्रतिडझन (१२ केळ) १० ते १५ रुपयांची वाढ झालेली आहे.

जळगाव, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून केळीची आवक घटली आहे. आंध्र प्रदेशातही केळी काढणीवर आलेली नाही. तेथे ऑक्टोबरमध्ये पिलबागांमधील (खोडवा) काढणी सुरू होईल.

तर नोव्हेंबरमध्ये नियमित हंगामातील केळीची आवक सुरू होईल. तमिळनाडूमध्ये आवक होत आहे. परंतु तेथेही मागणी वाढलेली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात किंवा देशांतर्गत बाजारात केळीला ३३०० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे.

जळगाव जिल्ह्यात मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये केळीची लागवड कमी होती. देशात सण-उत्सवाचे वातावरण आहे. यामुळे मागणी कायम आहे. पुढे आवक कमी होईल व मागणी अधिकची राहण्याची शक्यता आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचा कालावधी आहे. यामुळे दरात आणखी वाढ होईल, असे संकेत आहेत.

बाजारातही केळीला उठाव आहे. मात्र आवक कमी झालेली आहे. त्यामुळे केळीच्या दरात वाढ झालेली आहे. ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव असून त्यात मागणी वाढणार असल्याने केळीचे भाव वाढणार आहेत.
- कैलाश गौतम, फळ विक्रेता

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT