Livestock Market Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : सातारा जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारावर बंदी

Satara Livestock Market : गेल्या काही दिवसांपासून सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांत जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत असून, या लम्पी आजाराला रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना म्हणून सर्व गोवर्गीय जनावरांच्या वाहतुकीवर व बाजारावर प्रशासनाने बंदी घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांत जनावरांच्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. या आजाराची लागण आता जिल्ह्यातील कऱ्हाड व फलटण तालुक्यांत जनावरांना होत आहे.

फलटण, कऱ्हाड, कोरेगाव व माण या तालुक्यांतील नऊ गावांमध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली असून, २६ गाय व १५ बैल अशा एकूण ४१ जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

एका जनावराचा मृत्यू झाला असून, तीन जनावरे नियमित औषधाने बरी झाली आहेत. जिल्हा पशुसंवर्धन डॉ. विनोद पवार म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील एकूण तीन लाख ५२ हजार ४३६ गोवर्गीय जनावरांपैकी तीन लाख २३ हजार ६७ जनावरांचे लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

उर्वरित जनावरांची लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. सर्व पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करावे. रोग प्रादुर्भाव टोळ्यासाठी पशुपालकांनी आपले जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत व गोचीडनाशक औषध फवारणी करावी.

जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून उपचार करून घ्यावेत.’’ गावात जनावरांमध्ये रोग प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने कीटकनाशक औषध फवारणी करावी, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT