Atal Bhujal Scheme | Atal Bhujal  Agrowon
ताज्या बातम्या

Atal Bhujal Yojana : ‘अटल जल शॉर्ट फिल्म’चा निकाल जाहीर

Bhujal Department : सर्वसामान्य जनतेमधील सोशल मीडियाची आवड लक्षात घेऊन राज्यातील अटल भूजल योजनेच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या वतीने राज्यस्तरीय अटल जल व्हिडिओ फिल्म स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : सर्वसामान्य जनतेमधील सोशल मीडियाची आवड लक्षात घेऊन राज्यातील अटल भूजल योजनेच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या वतीने राज्यस्तरीय अटल जल व्हिडिओ फिल्म स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

त्यांचा निकाल भूजल विभागाने नुकताच जाहीर केला आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विभागाचे आयुक्त तथा प्रकल्‍प संचालक चिंतामणी जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पाणी बचत, पाण्याच्या काटकसरीने व किफायतशीर वापरासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा सदर स्पर्धेचा उद्देश होता. स्पर्धेमध्ये प्राप्त सर्व व्हिडिओ फिल्मसचे स्क्रीनिंग करून परीक्षण करण्यात आले होते.

पाणी या विषयाला अनुसरून ६५ शॉर्ट फिल्म, व्हिडिओ, रिल्स प्राप्त झाले. स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली होती व प्रवेश विनामूल्य होता. सर्व यशस्वी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे यांच्यासह भूजल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाच्या माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ दीपाली पाटील यांनी केले. आर. जे. बंड्या यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल व बक्षिसाचे स्वरूप पुढीलप्रमाणे :

शॉर्ट फिल्म :

प्रथम - युवा मित्र, नाशिक – प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. १०,००० चे रोख पारितोषिक

द्वितीय - किशोर देवराव गव्हाणे - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ७,०००

तृतीय - ऋतिक महिंद्र वाघमारे - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ५,०००

२) शॉर्ट व्हिडिओ :

प्रथम- कुलदीप देशमुख - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ७,०००

द्वितीय-अमोल मारुती रेडीज - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ५,०००

तृतीय- अलफिया मुजावर - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ३,०००

३) रिल्स :

प्रथम -नीलेश बारसिंग - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ५,०००

द्वितीय -राज चमरे - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. ३,०००

तृतीय-शुभांगी सचिन भोईटे - प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रु. २,०००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT