Atal Bhujal Scheme : अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धा

Water Scheme : सर्वसामान्य जनतेमध्ये सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अटल भूजल योजनेच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Scheme | Atal Bhujal Agrowon
Published on
Updated on

Pune News : सर्वसामान्य जनतेमध्ये सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन अटल भूजल योजनेच्या जनजागृतीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी व्यक्तींनी १० जूनपर्यंत प्रवेश नोंदविण्याची घोषणा भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी केली.

पाणी बचत, पाण्याच्या काटकसरीने व किफायतशीर वापरासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे हा सदर स्पर्धेचा उद्देश आहे. भूजल विभागामार्फत स्पर्धेचे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

तसेच प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मग्गीरवार यांनी अटल जल व्हिडिओ, शॉर्ट फिल्म स्पर्धा २०२३ चे उद्‌घाटन बुधवारी (ता. १०) केले. या वेळी विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. विजय पाखमोडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक आर. एस. गोसकी, सर्व प्रादेशिक विभागांचे प्रादेशिक उपसंचालक, विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र शासन आणि जागतिक बॅंक अर्थसाहाय्यित अटल भूजल योजना एक एप्रिल २०२० पासून महाराष्ट्रासह देशातील हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या ७ राज्यांत राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अमरावती, नागपूर या १३ जिल्ह्यांतील ११३३ ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करण्यासाठी अटल भूजल ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.

Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Yojana : अटल भूजल यंत्रणेची जिल्हास्तरीय कार्यशाळा

सध्याचे युग हे डिजिटल मीडियाचे युग आहे. व्हॉटसॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब यासारख्या सोशल प्लॅटफॉर्मचा वापर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात होत आहे.

सर्वसामान्य लोक व्हिडिओ, शॉर्ट फिल्मस, रिल्स, ॲनिमेशन व्हिडिओ, व्हिडिओ जिंगल तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

त्यामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता येते. यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ९१३०१५०३०७ तसेच ataljalgsda@gmail.com यावर संपर्क करावा.

Atal Bhujal Scheme | Atal Bhujal
Atal Bhujal Yojana : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

स्पर्धेचे नियम व अटी :

- स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून प्रवेश विनामूल्य आहे.

- पाणी या विषयाला अनुसरून जिंगल. शॉर्ट फिल्म, व्हिडिओ, रिल्स, ॲनिमेटेड फिल्मस स्पर्धकांना तयार करता येणार आहेत.

- उत्तम दर्जा व कल्पना असणाऱ्या शॉर्ट फिल्म्स, व्हिडिओ, जिंगलना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार

- सर्व यशस्वी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

- उत्तम दर्जाच्या शॉर्ट फिल्म, व्हिडिओ अटल भूजल योजनेच्या जनजागृतीसाठी विविध माध्यमांद्वारे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

- फिल्म ह्या मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये असाव्यात.

बक्षिसाचे स्वरूप :

शॉर्ट फिल्म - प्रथम दहा हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये

व्हिडिओ - प्रथम ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये

शार्ट व्हिडिओ, रिल्स - प्रथम पाच हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये

स्पर्धेचे विषय :

- भूजल व्यवस्थापन

- पाणी बचतीच्या पद्धती

- पीक फेरबदल

- लोकसहभागाचे महत्त्व

- महिलांचा गावाच्या विकासातील सहभाग

- महिलांची गटशेती

- सूक्ष्म सिंचनाचे फायदे

- कमी पाण्यावर येणाऱ्या पिकाची लागवड

- घरगुती पाणी बचतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम

- शेतीमधील पाणी बचतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम

- परसबाग लागवड

- पाणी अनमोल संपत्ती

- पाऊस पाणी संकलन

- आदर्श गावाची संकल्पना

- शोष खड्याचा उपयोग आणि महत्त्व

- सांडपाणी व्यवस्थापन

- घनकचरा व्यवस्थापन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com