Sangli Brinjal Rate agrowon
ताज्या बातम्या

Sangli Brinjal Rate : अस्मानी बरोबर सुलतान्यांनी लुटलं, वांगी उत्पादक शेतकऱ्यांनं उचललं टोकाचं पाऊल

sandeep Shirguppe

Brinjal Price : सध्या टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना काही अंशी चांगला भाव मिळत आहे. परंतु एकीकडे टोमॅटोला चांगला दर मिळत असताना वांगी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या बोरगावमधील एका शेतकऱ्याने वांग्याला दर नसल्याने थेट उभ्या पिकात रोटर फिरवला आहे. सध्या वांगी उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या काही दिवसांपासून वांगी पिकावर वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे दर्जेदार वांगी उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांना अगदी अल्प दरात वांगी विकण्याची वेळ येत आहे.

याचबरोबर व्यापाऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्वाला कंटाळून सांगली जिल्ह्यातील अमोल वाटेगावकर या शेतकऱ्याने वांग्याच्या उभ्या पिकावर रोटर फिरवून रोपे काढून टाकली.

वाटेगावकर यांची पूर्वी ही शेती जिरायती होती. शेतीच्या चारही बाजूला बाभळीच्या झाडांचा विळखा होता. यावर त्यांनी भरपूर काम करून एक एकराखाली जमीन पिकाऊ केली. मागच्या काही काळापासून ते या जमिनीवर काबाड कष्ट करत भाजीपाल्यांचे पीक घेतात.

वाटेगावकर यांनी यंदा वांग्याची लागवड केली होती. वांगी लावण करण्यापासून ते पीक येऊपर्यंत त्यांना जवळपास ६५ हजार रुपयांचा खर्च आला. दरम्यान मागच्या काही काळात पाणी टंचाईमुळे त्यांनी ठिबकच्या सहाय्याने पाणी व औषधांची मात्रा दिली.

अथक प्रयत्न करूनही अस्मानी संकटाला सामोरे जाताना वाटेगावकरांना रोगराईचा सामना करावा लागला. त्यांनी घेतलेल्या वांगी वाणाला अत्यंत कमी भाव मिळत राहिला. याचबरोबर व्यापाऱ्यांनीही त्यांची फसवणूक करत १० ते १५ रुपये किलो दराने वांगी खरेदी केली. परंतु प्रत्यक्ष बाजारात वांग्याचे दर ३५ ते ४० रुपये किलो आहेत.

बाजारात शंभर किलो वांगी घेऊन गेल्यानंतर व्यापारी ८०० ते ९०० रुपये देतात. त्यातून एका फवारणीचा खर्चही भागायचा नाही. तोडणी मजुरी तर पदरची द्यावी लागते. त्यामुळे रोटर फिरवल्याचे वाटेगावकर यांनी सांगितले.

याचबरोबर शेतकऱ्यांना दर मिळण्यासाठी शासनाने व्यापाऱ्यांवर बंधने आणली आहेत, तरीही शेतकऱ्याची फसवणूक होतेच. छापील बिलाची सक्ती असताना वरवरच्या पावत्या करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जाते. व्यापारी मालामाल आणि शेतकरी कंगाल बनत असल्याची खंत अमोल वाटेगावकर यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

Water Scheme : किकवी पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Agriculture Processing : ग्रामस्तरावर प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन गरजेचे

SCROLL FOR NEXT