Sangli Dryport : सांगलीत 'ड्रायपोर्ट' आता अशक्य, द्राक्ष बागायतदारांना धक्का

Sangli Dryport : मागच्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Sangli Dryport
Sangli Dryportagrowon
Published on
Updated on

Sangli Dryport : मागच्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट होणार अशी चर्चा सुरू होती. परंतु आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने याबाबत खुलासा दिला आहे. हा ड्रायपोर्ट होणार का याबाबत माहितीच्या अधिकाराखाली सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी माहिती मागवली होती.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यात ड्रायपोर्ट करण्याबाबत घोषणा करण्यात आली होती. त्याचे काय झाले याची विचारणा मी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे केली. याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) चा महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार एप्रिल २०१८ करण्यात आला.

सांगली येथील ड्राय पोर्टच्या विकासासाठी भूसंपादन आणि जेएनपीएला मदत करण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ला जमीन अधिग्रहण साठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून नामांकित केल्याची माहिती साखळकर यांनी दिली.

याचबरोबर महाराष्ट्रात सध्या गरजेहून अधिक ड्रायपोर्ट आहेत यामुळे नवीन प्रकल्पाला मान्यता मिळण्याचा प्रश्नच राहत नाही. तसेच महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे, अशी माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने माहिती अधिकारात दिली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात रांजणी किंवा सलगरे येथे ड्रायपोर्ट उभे राहण्याचे स्वप्न भंग पावले आहे.

दरम्यान कोल्हापुरलाही जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात ड्रायपोर्ट करण्याचा विचार सुरू आहे. परंतु हा ड्रायपोर्टही होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.

कलम ४.१.२ अन्वये, सीमा शुल्क विभागाने आयसीडीची विद्यमान संख्या आणि भविष्यातील आवश्यकतेच्या आधारावर राज्यांचे झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्राचे रेड झोन अंतर्गत वर्गीकरण करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही नवीन आयसीडी/सीएफएस (ड्राय पोर्ट) ला परवानगी दिली जाणार नाही.

दरम्यान खासदार संजय पाटील यांनी मुंबई मंत्रालयात नुकतीच ड्रायपोर्ट उभारण्याबाबत बैठक घेतली. त्यात सलगरे येथे जागा उपलब्ध करणार असल्याचे सांगितले होते . जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ने हा खुलासा केल्यामुळे आता जिल्ह्यात ट्रायपोर्ट होणार का? याबाबत शंका उपस्थित होत आहे.

Sangli Dryport
Sangli District Bank : सांगली जिल्हा बँकेकडून थकबाकी वसुलीचा धडाका

ड्रायपोर्ट म्हणजे काय?

ड्रायपोर्ट हे कृषी मालाच्या निर्यातीसाठी उपयुक्त ठरू शकते. यामुळे रेल्वे, रस्ते व सागरी मार्ग जोडण्याचे काम करते. परदेशांतून सागरी मार्गाने येणारा बंदरावर उतरवले जातात. तेथून रेल्वे मार्गाने ज्या शहरात माल पोहोचवायचा आहे तेथे नेला जातो. या पोर्टमध्ये कंटेनररची दुरुस्ती, मालाचा साठा करण्याची सुविधा उपलब्ध असते.

जिल्ह्यात कांदा, निर्यातक्षम द्राक्ष आणि डाळिंब उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा होणार होतो. या ड्रायपोर्टमुळे उद्योगांना कमी वेळेत कच्चा माल उपलब्ध करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे वाहतूक खर्च आणि श्रम कमी होवून रोजगार निर्मिती होवू शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com