Wheat Rate Agrowon
ताज्या बातम्या

Wheat Rate : गव्हाचे दर वाढूनही बाजारात आवक नगण्य

देशातील बाजारात यंदा गव्हाचे दर तेजीत आहेत. सरकारने निर्यातबंदी करूनही दरात जवळपास ११ टक्क्यांनी सुधारणा झाली.

Team Agrowon

पुणे ः देशातील बाजारात यंदा गव्हाचे दर (Wheat Rate) तेजीत आहेत. सरकारने निर्यातबंदी (Export Ban) करूनही दरात जवळपास ११ टक्क्यांनी सुधारणा झाली. तर गहू पीठाचे दरही वाढले. असे असूनही बाजारात गव्हाची आवक नगण्य होत आहे.

साधारणपणे गव्हाचे दर वाढल्यानंतर सरकार खुल्या बाजारात विक्री करून दर नियंत्रणात ठेवते; मात्र यंदा गव्हाचे दर जवळपास ११ टक्क्यांनी सुधारले. तरीही सरकारकडून खुल्या बाजारात गहू विक्रीसंदर्भात कोणत्याही हालचाली सुरू झाल्या नाहीत. याचा परिणाम बाजारातील दरावर जाणवतोय. गव्हाचा साठा असणारे स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार हळूहळू साठा बाहेर काढत आहेत. तर दुसरीकडे गव्हाला पीठ गिरण्यांची मागणी वाढलेली दिसतेय. त्यामुळे गहू आणि गहू पीठाच्या दरात तेजी आली आहे.

यंदा देशात गव्हाचे उत्पादन घटले. तसेच निर्यातही वाढली. गहू निर्यातीचा विचार करता २०२१ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर या काळात जवळपास २४ लाख टन निर्यात झाली होती; मात्र चालू वर्षात याच काळात जवाळपास ४६ लाख टन गहू निर्यात झाली. त्यामुळे देशातील बाजारात गहू दरात सतत वाढ होत आहे. यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या काळात गव्हाचे दर जवळपास ११ टक्क्यांनी वाढले. तर गहू पीठाच्या दराने १६ टक्क्यांची झेप घेतली.

सरकारने गहू आणि गहू पदार्थांच्या निर्यातीवर बंदी आणली; मात्र तरीही दरातील तेजी कायम आहे. सध्या मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे पीठ गिरण्यांनी सरकारकडे साठ्यातील ३० ते ४० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची मागणी केली. पण सरकारने आतापर्यंत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. यामुळे बाजारभावात आणखी सुधारणा होताना दिसतेय.

गव्हाचे दर वाढण्याची आशा
गव्हाचे दर सध्या रोजच वाढत आहेत. मागील आठवड्यात घाऊक व्यापारी आणि प्रक्रियादारांना २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटलने गहू मिळत होता; मात्र चालू आठवड्यात ३ हजार रुपये देऊनही गहू मिळत नसल्याचे, गहू प्रक्रियादारांनी सांगितले. मोठे स्टाॅकिस्ट आणि व्यापाऱ्यांना पुढील काळात गव्हाचे दर वाढण्याची आशा आहे. त्यामुळे ते गरजेप्रमाणे बाजारात गव्हाची विक्री करत आहेत.

किरकोळ विक्री दरात सुधारणा
प्रक्रियादारांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणेतील पीठ गिरण्यांकडे जानेवारीपर्यंत पुरेल एवढा गव्हाचा साठा शिल्लक आहे. मात्र पुर्वेतील गिरण्यांकडील साठा जवळपास संपत आलाय. केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, जोनवारी २०२२ मध्ये गव्हाचा किरकोळ विक्री दर २८ रुपये प्रति क्विंटल होता. तो चालू आठवड्यात ३१ रुपये ३० पैशांवर पोचला. तर गहू पिठाचा किरकोळ विक्री दर ३१ रुपयांवरून ३६ रुपयांपर्यंत वाढला.


नवा माल मार्च, एप्रिलपासून बाजारात
देशातील नवा माल मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून बाजारात येईल. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या मालावरच गरज भागवावी लागणार आहे. तसेच बाजाराचे लक्ष सरकारच्या विक्रीवरही असेल. पण बाजारात नवा माल येईपर्यंत गव्हाचे दर तेजीतच राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT