Grape Farming Agrowon
ताज्या बातम्या

Grape Pruning : द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी लांबणीवर

Vineyard Management : द्राक्षाची एप्रिल छाटणी १५ एप्रिल पर्यंत होणे अपेक्षित असते. फार तर एप्रिल अखेरपर्यंत ती ऑटोपायलाच हवी, ती पुन्हा पावसामुळे १५ मे पर्यंत लांबली आहे.

Team Agrowon

Jalna News : द्राक्षाची एप्रिल छाटणी १५ एप्रिल पर्यंत होणे अपेक्षित असते. फार तर एप्रिल अखेरपर्यंत ती ऑटोपायलाच हवी, ती पुन्हा पावसामुळे १५ मे पर्यंत लांबली आहे. त्याचा फटका जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील द्राक्ष बागांना बसणार आहे. जवळपास एक महिन्याने लांबलेल्या या छाटणीचा पुढील हंगामावर निश्चित परिणाम होणार आहे, असे द्राक्ष उत्पादकांचे म्हणणे आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची, नंदापूर, धारकल्याण, पिरकल्यान, वरूड, वरूडी, बोरखेडी, आदी शिवारात मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सटाना, दरकवाडी, पळशी परिसरातही द्राक्ष बागांचा विस्तार आहे.

जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात ऐरवी २५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या छाटण्या यंदा जवळपास ५ डिसेंबरपर्यंत चालल्या. पहिल्या टप्प्यात अर्ली छाटण्या २५ टक्‍के, ऑक्‍टोबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत जवळपास ६० टक्‍के तर त्यानंतर ५ डिसेंबरपर्यंत जवळपास ३० टक्‍के छाटण्या झाल्या. एकूण भागांपैकी जवळपास ४० ते ५० टक्के बागा हातच्या गेल्या.

द्राक्षाची एप्रिल छाटणी १५ एप्रिल पर्यंत होणे अपेक्षित असते. फार तर एप्रिल अखेरपर्यंत ती आटोपायलाच हवी, ती पुन्हा पावसामुळे १५ मे पर्यंत लांबली. त्यामुळे छाटणी लांबलेल्या बागा उशिरा निघणार व काडी तसेच सूक्ष्म घड निर्मितीसाठी अपेक्षित वातावरण त्यावेळी नसल्यास त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सद्यःस्थितीत छाटणी झालेल्या भागांना पाणी, खते देण्याचे काम शेतकरी करीत आहेत.

यंदा दर घटीचा फटका

डाऊनी, भुरी, घडकुज आदींचा प्रादुर्भाव द्राक्ष बागांवर झाल्याने खर्चही मोठा झाला. अनेक भागातील बागा फेल गेल्याने उत्पादनात घट आली. परंतु आपल्या भागातील द्राक्षाची मागणी असलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांत तसेच महाराष्ट्रातील अनेक भागांत बराच काळ थंडी कायम राहिली.

त्यामुळे द्राक्षाच्या मागणीत वाढ झाली नाही. त्याचा थेट परिणाम द्राक्ष दरावर झाला. बांगलादेश व अरब राज्यात द्राक्ष पाठवणारे व्यापारी त्या देशातील मागणी फारशी नसल्याने तिकडे द्राक्ष पाठवावी की नाही या विवंचनेत होते. त्याचाही परिणाम द्राक्ष दरावर झाला.

१५ एप्रिलपर्यंत अपेक्षित असलेल्या छाटण्या पंधरा मे पर्यंत चालल्या. त्याचा परिणाम पुढील हंगामावर होईल. यंदा हवामानाची प्रतिकूलता तर होतीच, शिवाय उठाव नसल्याने दरानेही द्राक्ष उत्पादकांचा घात केला.
- रवींद्र क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची, जि. जालना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT