Shirur APMC Agrowon
ताज्या बातम्या

Shirur APMC : शिरूर बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने बाजार समितीवर १५ डिसेंबरपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याचा आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी काढले आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची (Shirur APMC) मुदत संपल्याने बाजार समितीवर १५ डिसेंबरपासून प्रशासक नियुक्त करण्यात आला असल्याचा आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी काढले आहे. त्यानुसार बाजार समितीवर सहायक निबंधक शिरूर शंकर कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीवरील सभापती व संचालकांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

आदेशात असे म्हटले आहे, की महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियमान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार आदेश देण्यात येत आहेत, की कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर, या बाजार समितीचे सर्व समिती सदस्य १५ डिसेंबर २०२२ पासून सदस्य म्हणून पद धारण करण्याचे बंद होऊन ती सर्व पदे रिकामी झाली आहेत.

त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन प्रत्यक्षात संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत किंवा या आदेशाच्या तारखेपासून पुढील ६ महिने यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीचे दैनंदिन व प्रशासकीय कामकाज पार पाडण्यासाठी एस. एस. कुंभार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT