Agriculture Award : डॉ. सुरेंद्र काळबांडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार

डॉ. काळबांडे यांनी शेतीमाल सुकविण्याकरिता शेतात १४ सोलर टनेल ड्रायरची उभारणी केलेली असून, शेतकऱ्याच्या शेतावर सुधारित बायोगॅस संयंत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे.
Dr. Surendra Kalbande
Dr. Surendra KalbandeAgrowon
Published on
Updated on

अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील (PDKV) डॉ. सुरेंद्र काळबांडे (Dr. Surendra Kalbande) यांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना दापोली येथे ५० व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात आले. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व प्रधान सचिव (कृषी) एकनाथ डवले यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आहे.

Dr. Surendra Kalbande
Agrowon Business Excellence Awards 2022 : सुदृढ पशुधनातून विकासाची कास हाच वेट्रिनाचा ध्यास

बैठकीच्या उद्‍घाटन कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलसचिव, प्राध्यापक तथा अपारंपरिक ऊर्जास्रोत व विद्युत अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. काळबांडे यांचा सत्कार झाला. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे उपस्थित होते.

Dr. Surendra Kalbande
Agriculture Award : डॉ. बेग यांना उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्कार

डॉ. काळबांडे यांनी शेतीमाल सुकविण्याकरिता शेतात १४ सोलर टनेल ड्रायरची उभारणी केलेली असून, शेतकऱ्याच्या शेतावर सुधारित बायोगॅस संयंत्राचा मोठ्या प्रमाणावर प्रसार केला आहे. सौर प्रकाश कीटक सापळा हे तंत्रज्ञान विकसित करून चार कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून संयंत्र विक्रीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहे.

सौर जैव संकरिता सुष्वक गोशाळेत बायोगॅसद्वारे विद्युतनिर्मिती इत्यादी विषयावर मार्गदर्शन व संशोधन केले आहे. त्यांनी आतापर्यंत एम.टेक.चे २१ व पीएचडीचे पाच संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com