lumpi skin disease in animal Agrowon
ताज्या बातम्या

Lumpy Skin : परराज्यातील जनावरांच्या वाहतुकीला प्रतिबंध

राज्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे तेलंगणा आरटीओ चेक नाक्यावर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तालयाच्या पथकाने जनावरांची तपासणी करून इतर राज्यातून येणाऱ्या जनावरांवर प्रतिबंध घातला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : राज्यात जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) आढळून आल्यामुळे तेलंगणा आरटीओ चेक नाक्यावर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तालयाच्या पथकाने जनावरांची तपासणी करून इतर राज्यातून येणाऱ्या जनावरांवर प्रतिबंध (Animal Transport) घातला आहे.

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी यांनी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाकडून या बाबत वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव असल्यास त्यांना राज्यात प्रतिबंध घालण्यात येत आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर आरटीओ चेक पोस्टवर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त मधुसूदन रक्तपारखी यांच्या पथकाने भेट देऊन जनावरांची तपासणी केली.

तसेच या जनावरांना राज्यात प्रवेशाबाबत प्रतिबंध घातले आहेत. डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी सांगितले की जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही, परंतु पशुसंवर्धन विभाग सतर्क आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सतर्क आहे. जिल्ह्यात रस लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Policy Changes: पीकविम्यातील बदलांमुळे शेतकरी, सरकार अडचणीत

Village Development Survey: २३ हजार गावांचे सर्वेक्षण पूर्ण; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

Tur Price: तुरीचा दर १० हजार रुपयांवर

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

SCROLL FOR NEXT