Fruit Planting Agrowon
ताज्या बातम्या

Wildlife Attack : प्राण्यांच्या उपद्रवाचा फळ लागवडीला फटका

कोकणातील फळांमध्ये आंबा व काजूचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. यात दापोली तालुक्यात ३४८.६१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

Team Agrowon

Dapoli News: कोकणातील फळांमध्ये आंबा (Mango) व काजूचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. यात दापोली तालुक्यात ३४८.६१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून (Agriculture Department) देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रवाचा (Wildlife Rampage) फटका फळ लागवडीला (Fruit Crop Cultivation ) बसत असल्याचे सद्यस्थितीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

दापोलीत माकडांचा त्रास मोठा आहे. त्यामुळे बागायतदार फळझाडे लावण्याकडे दुर्लक्ष करतात. माकडांमुळे होणारे मोठे नुकसान तसेच निसर्गाच्या प्रकोपामुळेदेखील बागायतदार चिंताग्रस्त आहेत. थंडी पुरेपूर न पडल्यास व ऊन अधिक पडल्यास आंब्याचा मोहोर करपून जातो, तर कधी अवकाळी पाऊस पडतो.

त्यामुळे हातातोंडाशी आलेला आंबा धुळीस मिळतो. नुकसान पहाता नव्याने बागायतीं रुजवून करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी दिसून येत आहे. यामुळे नव्या लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या बागायतदार बागेतील झाडांची जोपासना करत आहेत. माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी बागायतदारांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT