dashparni ark  
ताज्या बातम्या

Dashaparni Extract : शेतकरी गटाकडुन दशपर्णी अर्क निर्मितीचा प्रयोग

Agriculture News : रासायनिक अवशेषमुक्त शेतमाल उत्पादन हा शेतकरी गटाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने हनुमान शेतकरी गटाच्या सदस्यांनी एकत्र येत दशपर्णी अर्क द्रावण तयार केले.

Team Agrowon

Pune News : वाल्हे (ता. पुरंदर) नजीक हनुमानवस्ती येथे नुकतेच पुरंदर कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून येथील जय हनुमान शेतकरी गटाच्या सदस्यांनी दशपर्णी अर्क निर्मिती केली.

यामध्ये हनुमानवस्ती येथील जय हनुमान शेतकरी गटातील रामचंद्र पवार, प्रताप पवार, कैलास पवार, आल्हाद पवार, बजरंग पवार, विनायक पवार, अशोक पवार, उत्तम पवार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

रासायनिक अवशेषमुक्त शेतमाल उत्पादन हा शेतकरी गटाचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने हनुमान शेतकरी गटाच्या सदस्यांनी एकत्र येत दशपर्णी अर्क द्रावण तयार केले. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी कडूलिंब, सीताफळ, करंज, रूई, गुळवेल आदि प्रकारच्या झाडपाल्याचा वापर करण्यात आला.

तसेच गोमूत्र, मिरची, लसूण यांचे मिश्रण वापरण्यात आले. येत्या महिनाभरात गटातील सदस्यांना या दशपर्णी अर्काचे वितरण करण्यात येणार आहे. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क उपयुक्त असल्याचे पाणी फाउंडेशनचे आबा लाड यांनी सांगितले.

उत्पादन खर्च कमी करून महागड्या रसायनांच्या तुलनेत दशपर्णी अर्काचे चांगले परिणाम मिळणार आहे. त्यामुळे यास आम्ही प्राधान्य देणार असल्याचे हनुमान शेतकरी गटाचे प्रताप पवार व कैलास पवार यांनी सांगितले.

दशपर्णी अर्क निर्मिती प्रक्रियेदरम्यान कृषी सहाय्यक गीता पवार व पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रामचंद्र पवार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT