महारुद्र मंगनाळे
आज एका मित्राचा व्याकूळ होऊन फोन आला होता....अरे..तुला काही रुद्राहटची चिंता आहे की नाही..... सारखं फिरू लागलायस्..
मी म्हटलं,रुद्राहट हे मी पाहिलेलं छोटसं स्वप्न होतं.ते मागेच पूर्ण झालंय. आता तिथं नव्याने फार काही करण्यासारखं राहिलेलं नाही आणि गरजही नाही. माझ्या गैरहजेरीत सगळं छान चालू आहे,ही माझ्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे.
कोरडवाहू शेतीत कोणीही निर्णय केला तरी चुकतोच...त्यासाठी माझी गरज काय? सविता,नरेश निर्णय करताहेत, अंमलबजावणी होतेय. यावर्षी पहिल्यांदा मळ्यात सरी पद्धतीने सोयाबीन पेरणीची तयारी झालीय. पहिल्यांदाच नरेशने गांडूळ खत तयार केलाय.
सीताफळाच्या सगळ्या झाडांची छाटणी झालीय.नरेशच्या मदतीला गजानन आहे. खरीपाच्या पेरणीची सगळी कामं होऊनही पाऊस नाही.
आता कोणती कामं करायची असा त्यांच्या समोरच प्रश्न आहे.अशा स्थितीत मी हटवर राहून काय करणार होतो? उलट माझ्या गैरहजेरीत सगळं काही उत्तम चालू आहे,ही माझ्यासाठी किती आनंददायी बाब आहे.
काहीही झालं तरी शेतीत तोटा होणार हे नक्की.त्याची भरपाई व्हावी यासाठी मी पुस्तक प्रकाशन,वितरण करतोयचं की..! आणि मुक्तरंगही माझ्या गैरहजेरीत चालतयंच की...मी म्हटलं,आयुष्यभर एकाच गोष्टीत अडकून पडणं बरं नाही दोस्ता.. त्यातून बाहेर पडायला शिक. तुझ्याच भाषेत सांगायचं तर,...कितीबी केलं तर,थोडचं वर कोणी घेऊन जाणार आहे..