Udhhav Thackeray Prakash Ambedkar Agrowon
ताज्या बातम्या

Shivsena VBA Alaince : आंबेडकर-ठाकरे युती अकोल्यात `गेमचेंजर' ठरणार?

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) या दोन पक्षांनी अखेर सोमवारी (ता.२३) युतीवर शिक्कामोर्तब केले. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने बहुप्रतिक्षित असलेली ही घोषणा करून कार्यकर्त्यांना पुढील मार्ग दाखविला.

Team Agrowon

अकोला : वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) या दोन पक्षांनी अखेर सोमवारी (ता.२३) युतीवर शिक्कामोर्तब केले. दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने बहुप्रतिक्षित (VBA Shivsena Alliance)असलेली ही घोषणा करून कार्यकर्त्यांना पुढील मार्ग दाखविला. या घोषणेनंतर अकोल्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हा जल्लोष येत्या काळातील निवडणुकांमध्ये कितपत खरा उतरतो, याची अद्याप प्रतीक्षा करावी लागेल.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा या भागात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा आहे. जिल्हा परिषदेची सत्ता त्यांचा पक्ष अनेक वर्षांपासून एकहाती सांभाळत आहे. आता संख्याबळ काठापर्यंत पोचले तरी प्रमुख पदांवर पक्षाची सत्ता टिकून आहे. सत्ताकेंद्र वंचितने सातत्याने आपल्या ताब्यात कायम ठेवलेले असतानाच आता शिवसेना (ठाकरे) गट सोबत आल्याने ताकद वाढेल, अशी शक्यता आहे.

जिल्ह्यातील गेल्या काळातील घडामोडी पाहिल्या तर ५३ सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत ‘वंचित’च्या सर्वाधिक जागा आहेत. तरी सत्ता स्थापनेत भाजपने अप्रत्यक्ष मदत केल्याचे बोलले जात होते. भाजपच्या पाच सदस्यांनी मतदानात भाग न घेतल्याने ‘वंचित’चा सत्तेचा मार्ग सुकर झाला.

आता भाजपाच्या विरोधात ‘वंचित’ने अधिकृतपणे उभी राहिली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केलेल्या आघाडीने जिल्हा परिषदेत पुन्हा समीकरण बदलते की काय हे बघण्यासारखे आहे. कारण जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १२ सदस्य असून त्यांचे पाठबळ वंचितला मिळाल्यास सत्तास्थान आणखी बळकट होईल. सध्या शिवसेनेकडे विरोधी पक्षनेते पद आहे.

अकोला जिल्ह्यात गावागावांत पोचलेल्या ‘वंचित’च्या नेटवर्कचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. दोन्ही पक्षांचे गावागावांत बळ आहे. ही युती येत्या काळात भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनण्याची चिन्हे आहेत. कारण यापूर्वीच्या विधान सभा निवडणुकीत ‘वंचित’चा उमेदवार बहुतांश मतदार संघात दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे जिल्ह्यात एक आमदार आहे. ‘वंचित’ सोबत आल्याने येत्या काळात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी या युतीबाबत काय भूमिका घेतात, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. वंचित, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर भाजपला हे आव्हान झेपण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे या चार पक्षांच्या नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी मोठी ओढाताण होऊ शकते. ‘वंचित’चे शिवसेनेसोबत जाणे किती गेमचेंजर राहील, हे येत्या काळात कळून येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yellow Pea Import: पिवळ्या वाटाण्यावर ३० टक्के आयात शुल्क

Banana Price Drop: सेलू तालुक्यात केळीदर ५०० रुपये प्रति क्विंटल

MGNREGA Benefit Limit: ‘मनरेगा’तील वैयक्‍तिक लाभांच्या योजनांसाठी दोन लाखांची मर्यादा

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविमा नोंदणीचे काम सुरू

Maharashtra Weather Update: राज्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT