Udhhav Thackeray : ठाकरे-आंबेडकर यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा

राज्यात लवकरच शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रित दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिने खलबते सुरू आहे.
Thackeray Ambedkar
Thackeray AmbedkarAgrowon

मुंबई ः राज्यात लवकरच शिवशक्ती-भीमशक्ती (Shivshakti Bhimshakti) एकत्रित दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिने खलबते सुरू आहे. सोमवारी (ता. ५) मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीच्या रुपाने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चौथा पक्ष एकत्र येणार असल्याची शक्यता आहे.

Thackeray Ambedkar
Udhhav Thackeray: शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती

आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि आंबेडकर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामधील भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून करण्यात आला होता. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत प्राथमिक चर्चा होत असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर होते तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर, त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर बैठकीला हजर असल्याची माहिती आहे. याआधी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई आणि बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाच्या दोन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गट आणि वंचित यांच्या युतीवर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं बोलले जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com