Karanataka News: केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) कोणतेही अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान न देता तूर खरेदी केली जात असल्याने कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी रस्त्यावर तूर ओतून संताप व्यक्त केला. .या प्रश्नी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २९) कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी शहरात रस्त्यावर तुरीचा ढीग लावून आंदोलन केले. त्यांनी राज्य सरकारकडे सुधारित किमान आधारभूत किंमत आणि प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी केली आहे..Karnataka Farmers Protest: कर्नाटकातील शेतकऱ्यांनी तूर आणून ओतली रस्त्यावर.रयत संघाच्या कल्याण कर्नाटक विभागीय अध्यक्ष पंपन्ना नाईक यांनी सांगितले, की केंद्र सरकारने निश्चित केलेला तूर खरेदीचा प्रति क्विंटल ८ हजार रुपये भाव पुरेसा नाही. कारण यातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही..तुरीची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ८,५०० रुपये निश्चित करावी. तसेच शेतकऱ्यांना किफायतशीर भाव मिळावा यासाठी राज्य सरकारने प्रति क्विंटल ४ हजार रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान द्यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे..Farmers Protest: शेतकऱ्यांचे दहा तास पाण्यात उतरून आंदोलन.केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. त्यांनी तुंगभद्रा धरणावर क्रेस्ट गेट्स बसवण्यास उशीर केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे रब्बी पिकांसाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. .पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना शेती सोडून कामाच्या शोधात स्थलांतर व्हावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने पीककर्ज माफ करावे, शेतीसाठी तातडीने पाणी पुरवठा करण्याची मागणीही केली आहे. या संदर्भात शेतकरी नेत्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागणीचे निवेदन पाठविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.