Millet
Millet Agrowon
ताज्या बातम्या

Millet Year : तृणधान्य वर्ष साजरे होतानाही राज्यात क्षेत्र मात्र घटतेच !

Suryakant Netke

Nagar News : देशात यंदा तृणधान्य वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त तृणधान्याचे क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केले जात असले तरीही यंदा राज्यात तृणधान्याचे क्षेत्र घटतेच आहे. खरिपात सर्वाधिक बाजरीचे पीक घेतले जाते.

बाजरी, ज्वारी, रागी (नाचणी), राळा, कोद्रा, वरई, सावा यापैकी खरिपात सर्वाधिक क्षेत्र बाजरीचे असते. आतापर्यंत गतवर्षीपेक्षा ५८ हजार हेक्टरवर कमी पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसाचा तृणधान्याच्या पेरणीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

देशात तृणधान्य क्षेत्र वाढीसह दुर्मिळ होत असलेल्या तृणधान्याची जपवणूक, त्यासबंधीचे मार्केट याबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी कृषी विभागाकडून माहिती, अभियान व जनजागृती केली जात आहे. यंदा तृणधान्याचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने बियाणे किटचे वाटप केले. मात्र असे असले तरी खरिपातील पेरणीची स्थिती पाहिली तर तृणधानाच्या क्षेत्रात फारशी वाढ होताना दिसत नाही.\

राज्याचे सरासरी क्षेत्र १ कोटी ४२ लाख २ हजार ३१८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत खरिपात १ कोटी ३७ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. खरिपात कापूस, सोयाबीन आणि बाजरी हे जास्त क्षेत्राचे पीक आहे. यंदा आंतरराष्ट्रीय तृणधान्य (मिलेट) वर्ष साजरे केले जात आहे.

त्या अनुषंगाने तृणधान्याचे क्षेत्र वाढण्याची अपेक्षा होती, मात्र फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही. बाजरीचे राज्याचे ६ लाख ६९ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत बाजरीची राज्यात ३ लाख ३५ हजार ७३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी कालावधी संपल्याने क्षेत्रात फारशी वाढ होईल असे दिसत नाही. गतवर्षी बाजरीच्या क्षेत्राने ४ लाख हेक्टरचा टप्पा पार केला होता.

रागीची गतवर्षी ३३ हजार ५७० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीएवढी पेरणी झाली असली तरी वाढ मात्र झालेली नाही. खरिपात ज्वारीचे फारसे पीक घेतले जात नाही. यंदा (आतापर्यंत) १ लाख ७ हजार हेक्टरवर पेरणी गेली आहे. गेल्यावर्षी १ लाख ४२ हजार हेक्टर, तर २०२१-२२ ला ३ लाख ३९ हजार हेक्टर, २०२०-२१ ला ३ लाख ७८ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

मागील काही वर्षीची आकडेवारी पाहिली तर क्षेत्र कमी होत आहे. आतापर्यंतचा विचार केला तर नाशिक, धुळे, जळगाव, नगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड हे जिल्‍हे वगळले तर बहुतांश जिल्ह्यात अल्प प्रमाणात बाजरी पेरली आहे. आदिवासी पट्ट्यातील पीक असलेल्या नाचणीसह अन्य तृणधान्याची कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर व इतर काही जिल्ह्यांतील अपवाद सोडला तर अन्य जिल्ह्यांत पेरणी नाही.

अकोल्यात ‘सावा’ची जपवणूक

तृणधान्यातील ‘सावा’ दुर्मीळ व नामशेष होत असलेले पीक आहे. आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असलेले हे पीक आहारात असावे यासाठी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम असलेल्या फोपसंडी गावांत यंदा कृषी विभागाच्या पुढाकाराने ‘सावा’चे जतन केले जात आहे. २५ शेतकऱ्यांच्या माध्यमातून साडेबारा एकरावर यंदा हे पीक घेतले जात आहे. कृषी विभागाने या शेतकऱ्यांना बियाणे दिले आहे. या प्रयोगातून पुढील वर्षी ‘सावा’चे मुबलक बियाणे उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.

वर्षनिहाय तृणधान्य पेरणी (हेक्टर).....

बाजरी...................रागी (नाचणी). .............इतर तृणधान्य (राजगिरा, राळा, कोद्रा, वरई, सावा, भादुली)

- २०१९-२० ६ लाख ७२ हजार......८२ हजार........१ लाख १३ हजार

- २०२०-२१ ८ लाख ८७ हजार.....८१ हजार .......९९ हजार

- २०२१-२२ ६ लाख ६० हजार .....८१ हजार........६० हजार

- २०२२-२३ ४ लाख ७ हजार ......६८ हजार ......५४ हजार

- २०२३-२४ ३ लाख ३५ हजार.....६२ हजार...... ३४ हजार (८ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Sangh Fraud : शेतकरी संघ अपहार प्रकरण; मुख्य व्यवस्थापकाला २० लाख दिल्याचा आरोप, संचालक बैठकीत खळबळ

Mhaisal Water Scheme : विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे तातडीने मार्गी लावा

Maharashtra Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत विजांच्या लखलखाटांसह पाऊस

Agrowon Podcast : हळदीतील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, हळद आणि टोमॅटोचे काय आहेत दर ?

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

SCROLL FOR NEXT