Sugarcane Crushing Season Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing Season 2023 : पंधरा ऑक्टोबरपासून गाळपाला परवानगी द्या

Sugarcane Season Maharashtra : राज्यातील खासगी साखर कारखान्यांचे नेतृत्व करणाऱ्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनने (विस्मा) यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा आग्रह धरला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील खासगी साखर कारखान्यांचे नेतृत्व करणाऱ्या वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनने (विस्मा) यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा आग्रह धरला आहे.

‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. श्री. शिंदे यांच्याकडे गाळप हंगाम ठरविणाऱ्या मंत्री समितीचे अध्यक्षपद असून श्री. ठोंबरे हे सदस्य आहेत. त्यामुळे या पत्रव्यवहाराला महत्त्व आहे.

“राज्यात कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक पट्ट्यांमधील उत्पादन आणि साखर उतारा या दोन्ही घटकांवर यंदा परिणाम होईल. त्यामुळे साखर आणि इथेनॉलच्या उत्पादनात घट होणार आहे,” असे ‘विस्मा’चे म्हणणे आहे.

कमी पावसामुळे उसाच्या उभ्या पिकाची वाढ कशी होणार, हा सध्या चिंतेचा विषय आहे. उसाचा वापरदेखील गुऱ्हाळे, गूळ भुकटी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर होतो आहे.

त्यामुळे ऊस गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपाचा परवाना घेणाऱ्या कारखान्यांसमोर कमी ऊस उभी असेल. परिणामी यंदाचा गाळप हंगाम ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू करण्याचा निर्णय आपल्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने घ्यावा.

‘विस्मा’ने अशी मागणी केंद्र शासनाकडेदेखील केली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, विस्माने केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनाही एक पत्र पाठविले आहे.

“उत्तर प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रदेखील साखरेचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. गेल्या हंगामाच २१० साखर कारखान्यांनी एकूण १०५२ लाख टन गाळप केले होते. त्यापासून १०५ लाख टन साखर तयार केली होती. उतारा १० टक्के आला होता. यंदा साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, यंदा १४.३८ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. मात्र, गेल्या हंगामात १४.८७ लाख हेक्टरवर ऊस उभा होता,” असे या पत्रात म्हटले आहे.

राज्यात यंदा दुष्काळसदृश स्थिती असून साखर कारखान्यांना कमी ऊस उत्पादन व कमी साखर उतारा या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, असे ‘विस्मा’ने केंद्र शासनालादेखील कळविले आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुऱ्हाळांना मोठ्या प्रमाणात ऊस दिला जात आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसमोर कमी ऊस पुरवठ्याचे संकट ओढावते आहे. त्यामुळे कारखान्यांना गाळप हंगाम लवकर सुरु करण्यासाठी मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘लवकर हंगाम सुरु करण्याचा फायदा होईल’

महाराष्ट्राचा गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास दोन फायदे होतील. १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरु केला तर साखर निर्मिती नियोजित वेळेत होईल. सणासुदीला साखरेचा पुरवठा पुरेसा होईल. त्यातून साखरेचे बाजारभावदेखील संतुलित राहतील, असे ‘विस्मा’ने केंद्राला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Procurement: राज्यात ७.६१ लाख टन हरभरा खरेदीला मंजुरी

Vidarbha Irrigation Update: शासन लेखी विदर्भातील सिंचन अनुशेष संपुष्टात

Kidney Trafficking: किडनी तस्करी रॅकेटमधील आरोपींना ‘मकोका’ लावा

Irrigation Subsidy Issue: मराठवाड्याला अनुशेष अनुदानाचा वाटा कमीच

Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढणार

SCROLL FOR NEXT