Crop Loan
Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : परभणीत दोनशे कोटी रुपयांवर पीककर्जाचे वाटप

Team Agrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामात (Rabi Season) ३० नोव्हेंबर अखेर परभणी जिल्ह्यातील एकूण २० हजार ७८९ शेतकऱ्यांना २०० कोटी १५ लाख रुपये (३२.०३ टक्के) कर्जवाटप झाले आहे. राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज (Crop loan) वाटपात आघाडीवर आहेत. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, खासगी बँका, जिल्हा बँक असा क्रम आहे.

परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात विविध बँकांना ६२४ कोटी ८० लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यात राष्ट्रीयकृत बँकांना ३६१ कोटी ७३ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला ८६ कोटी ९५ लाख रुपये, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १२९ कोटी १८ लाख रुपये, खासगी बँकांच्या ४६ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्टाचा समावेश आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी १७ हजार १७१ शेतकऱ्यांना १६६ कोटी ८० लाख रुपये ४६.११ टक्के) पीककर्ज वाटप केले.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २ हजार ६६ शेतकऱ्यांना २० कोटी ७४ लाख रुपये (२३.८५ टक्के), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ९७२ शेतकऱ्यांना ४ कोटी ३४ लाख रुपये (३.३६ टक्के), खासगी बँकांनी ५८० शेतकऱ्यांना ८ कोटी २७ लाख रुपये (१७.६२ टक्के) पीककर्ज वाटप केले आहे. नोव्हेंबर अखेर १७ हजार ६५३ शेतकऱ्यांनी १६७ कोटी १५ लाख रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे नूतनीकरण करून घेतले आहे. एकूण ३ हजार १३६ शेतकऱ्यांना ३३ कोटी रुपये नवीन कर्ज वाटप करण्यात आले. गतवर्षी (२०२१) नोव्हेंबर अखेरपर्यंत १३ हजार १०४ शेतकऱ्यांना १२३ कोटी ८४ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले होते.

रब्बी पीककर्ज वाटप स्थिती (कोटी रुपये) ३० नोव्हेंबरपर्यंत

बँक उद्दिष्ट वाटप रक्कम शेतकरी संख्या टक्केवारी

भारतीय स्टेट बँक २३१.५८ १५६.१३ १६१३१ ६७.४२

महाराष्ट्र ग्रामीण बँक ८६.९५ २०.७४ २०६६ २३.८५

जि.म.सहकारी बँक १२९.१८ ४.३४ ९७२ ३.३६

बँक ऑफ बडोदा २६.६९ ४.६८ ५०५ १७.५३

बँक ऑफ इंडिया ४.८० ०.६८ ५८ १४.१७

बँक ऑफ महाराष्ट्रा ३२.७६ २.३८ १७६ ७.२६

कॅनरा बँक १९.१९ १.७० १७६ ८.३६

इंडियन बँक ९.७८ ०.१२ १७ १.२३

इंडियन ओव्हरसीज बँक ४.२१ ०.३७ ३२ ८.७९

पंजाब नॅशनल बँक ४.३९ ०.४० ४७ ९.११

युको बँक ९.५८ ०.०७ ६ ०.७३

युनियन बँक ऑफ इंडिया १३.८५ ०.०५ ६ ०.३६

अॅक्सिस बँक ५.०७ ०.६१ १४ १२.०३

एचडीएफसी बँक १५.४७ १.५२ ७७ ९.८३

आयसीआयसी बँक १२.२४ ५.३२ ३५३ ४३.४६

आयडीबीआय बँक १४.१६ ०.८२ १३६ ५.७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT