Devendra Fadanvis Agrowon
ताज्या बातम्या

Devendra Fadanvis : अकोला हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल ः उपमुख्यमंत्री फडणवीस

अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्या काळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

टीम ॲग्रोवन

अकोला : ‘‘अकोला रेल्वे स्थानक (Akola Railway) हे दक्षिण व उत्तरेकडील राज्यांना जोडणारे महत्त्वाचे स्थानक आहे. अकोला-अकोट पॅसेंजर रेल्वे सेवेमुळे उत्तरेकडील राज्ये अकोल्याशी जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून येत्या काळात देशात हा जिल्हा दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी व्यक्त केला.

अकोला-अकोट पॅसेंजर (गाडी क्र.०७७१८)चा प्रारंभ सोहळा बुधवारी (ता.२३) येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर झाला. यावेळी ऑनलाइन पद्धतीने श्री. फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे सहभागी होते. समारंभप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे आणि आमदार रणधीर सावरकर, रेल्वेच्या नांदेड विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंह आणि अकोला रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक शंकर शिंदे उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, ‘‘अकोला-खांडवा’ या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाच्या कामातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ‘अकोला-अकोट’ हा ४४ किलोमीटरचा रेल्वे मार्ग महत्त्वाचा आहे. ब्रॉड गेजच्या पुढच्या टप्प्यात ‘अकोट ते खांडवा’ (मध्यप्रदेश) रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.

हा रेल्वे मार्ग पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या भागातील वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. या रेल्वे मार्गामुळे अकोला, बुऱ्हाणपूर आणि खांडवा शहरांना जोडण्यात येणार आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT