Prithviraj Chavan  Agrowon
ताज्या बातम्या

Ajit Pawar : अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर ः पृथ्वीराज चव्हाण

Team Agrowon

Karad News : अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील, अशी माझी माहिती आहे, अशी टिप्पणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (ता. ३) केली.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अभिवादन करण्यासाठी आले होते. त्या वेळी आमदार चव्हाण हे प्रीतीसंगमावर दाखल झाले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की जनतेला गद्दारी अजिबात आवडत नाही.

जे भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जावे. त्यांना योग्य जागा कळेल. मोदी व भाजपविरोधात महाविकास आघाडी कायम राहणार आहे. जे सोबत आहेत त्यांच्यासोबत ताकदीने आम्ही भाजपविरोधात लढा देणार आहोत.

शिवसेना फुटली त्यातील पक्षांतर बंदीचा निकाल ऑगस्टमध्ये आहे. त्यात निकाल सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ आहे. सरकार कोसळू नये यासाठीची भाजपकडून हा प्रयत्न सुरू आहे.

त्यातूनच अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करतील आणि पुढे अजित पवार यांना मुख्यमंत्री करतील, अशी माझी माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT