Ajit Pawar Live : आम्ही फुटलो नाही, संपूर्ण राष्ट्रवादी पक्षच सरकारमध्ये सहभागीः अजित पवार

Latest News Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडलेली नसून संपूर्ण पक्ष म्हणूनच राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Ajit Pawar Press Conference : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फुट पडलेली नसून संपूर्ण पक्ष म्हणूनच राज्य सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलेला आहे, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

अजित पवार यांनी बंड करून रविवारी (ता. २) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्याच्या राजकारणात भूकंप

आगामी विधानसभा, लोकसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावरच लढवू, असे अजित पवार यांनी सांगितले.

तुमच्या बंडाला शरद पवार यांचा आशीर्वाद आहे का, या प्रश्नावर स्पष्ट उत्तर न देता आमच्या निर्णयाला सगळ्यांचा पाठिंबा आहे, असे अजित पवार म्हणाले.

राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत देश मजबुतीने प्रगती करत आहे.

त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा वेगाने विकास व्हावा, सर्व घटकांना मदत करता यावी, केंद्राचा निधी राज्याला मोठ्या प्रमाणात मिळावा या विचाराने आम्ही एकत्रितपणे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बहुतांश आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Ajit Pawar News : आता डबल इंजिन नाही ट्रिपल इंजिन सरकार; आता बुलेट ट्रेनच्या वेगाने सरकार धावेल

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपचा पाठिंबा असलेल्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, आम्ही महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेसोबत गेलो तर मग भाजपसोबत का जाऊ शकत नाही, अशा शब्दांत पवार यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले.

छगन भुजबळ यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत विकासाच्या मुद्यावर सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले. ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्यात सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले. २०२४ मध्येही नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील, असे शरद पवार यांनी सांगितल्याचा दावाही भुजबळ यांनी यावेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com