Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Climate Change : ‘बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन करावे’

या पुढील काळात शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन करावे लागणार आहे,’’ असे प्रतिपादन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी व्यक्त केले.

टीम ॲग्रोवन

मंचर : ‘‘जागतिक तापमान (Climate Change) वाढीमुळे शेतकरी संकटात सापडला असून, या पुढील काळात शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन करावे लागणार आहे,’’ असे प्रतिपादन मंचर कृषी उत्पन्न बाजार (APMC) समितीचे माजी सभापती देवदत्त निकम (Devdutt Nikam) यांनी व्यक्त केले.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंचर बाजार समितीच्या सभागृहात प्रशासक पी. एस. रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.२) झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी उपसभापती संजय शेळके, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले,

बाळासाहेब मेगडे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, प्रमोद वळसे पाटील, सागर थोरात, दत्तात्रेय हगवणे, ज्ञानेश्वर घोडेकर, अशोक डोके, दत्तात्रेय वावरे, दत्तात्रेय तोत्रे, मयुरी शिगाडे, प्रभारी सचिव सचिन बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री.निकम म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या माध्यमातून वेळोवेळी शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात. नव्याने सुरू केलेल्या लोणी उपबाजार समितीला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. चांडोलीत एक हजार टनाचे गोडाऊन उभारले असून ते या वर्षापासून शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात येणार आहे.

घोडेगाव उपबाजार आवारात कांदा मार्केट सुरू करणे, आवारात लिलाव शेड व आडत गाळे अशी सर्व सुविधांनीयुक्त बाजारपेठेची उभारण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. बाजार आवारात तारेच्या कुंपणाचे काम सुरू आहे.

लोणी उपबाजार आवारात खुला (मोकळा) व पिशवीतील कांदा खरेदी-विक्री व्यवहार सुरू केले आहेत. नवीन ५० टन व ६० टन इलेक्ट्रॉनिक वजन काटा सुरू करण्यात आला आहे. चांडोली खुर्द उपबाजार आवार येथे लिलावगृह, अंतर्गत रस्ते, गटारे, स्वच्छतागृहे, वाहनतळ, माल चढविण्याचे प्लॅटफॉर्म उभारणी केली जात आहे. या वेळी अहवाल वाचन सचिन बोऱ्हाडे यांनी केले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity: नाशिक जिल्ह्यात १०८४ गावांमध्ये संभाव्य टंचाई

Local Body Elections: रत्नागिरी,सिंधुदुर्गात उमेदवारांपेक्षा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण

Local Body Elections: कोल्हापुरात वैयक्तिक गाठीभेटींना प्राधान्य

Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT