Yavatmal News  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Land : पावसामुळे दिग्रसला जमीन गेली खरवडून

Yavatamal Rain Update : यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. काही हवामान तज्ज्ञांच्या आवाहनावरून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्ह्यात मंगळवारी (ता. ४) जोरदार पावसाने हजेरी लावली. दिग्रस तालुक्‍यातील तुपटाकळीसह बेलोरा शिवारातील शेतीला याचा जबर फटका बसला. या नुकसानग्रस्त शेतीची काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी (ता. ५) पाहणी केली. मदतीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी या वेळी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. काही हवामान तज्ज्ञांच्या आवाहनावरून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे.

अशातच मंगळवारी जिल्ह्याच्या अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. दिग्रस तालुक्‍यातील तुपटाकळी, कलगाव, सिंगद या मंडलांत १२५.२५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.

त्यामुळे परिसरातील काही नाल्यांना पूर आल्याने त्याचे पाणी शेतात शिरल्याने अनेकांची शेती खरडून गेली आहे. या नुकसानग्रस्त भागातील शेतीची काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी भेट देत पाहणी केली.

या वेळी शेतकरी निखील वानखडे, सुखदेव शुक्‍ला, प्रमोद वानखडे, राजेंद्र वानखडे, सुरेश शुक्‍ला, साहेबराव जगताप, राजकुमार वानखडे, अभिजित जगताप, पांडुरंग बिनगे, ज्ञानेश्‍वर बिनगे, संगीत जगताप, चंद्रकांत शेंबडे, धनराज शेंबडे, सुभाष रसाळ, संतोष शुक्‍ला, संजय जगताप उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme: कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तीन समित्यांची स्थापना

Farmer Loan Waiver: कर्जमाफी फसवी, दुष्काळ जाहीर करा; महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल

Agriculture Department Cadre Structure: आकृतिबंध सर्व संवर्गांचे हित साधणारा: कृषी आयुक्त सूरज मांढरे

Agri Irrigation Crisis: पिके वाचवायची कशी? ‘उपसाबंदी’मुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट

Fodder Shortage: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर चाराटंचाईचे संकट शक्य: पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT