Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात मध्यम पावसाची हजेरी

Pune Rain News : जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, पूर्व भागातील शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, सासवड भागात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.
Rain
Rain Agrowon
Published on
Updated on

Pune Weather News : जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, पूर्व भागातील शिरूर, इंदापूर, दौंड, बारामती, सासवड भागात पावसाचा जोर काहीसा वाढला आहे.

अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीस सुरूवात केली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पावसाचा जोर नसल्याने पेरण्या खोळंबल्याची स्थिती आहे.

गेल्या आठवडाभर पश्चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, जुन्रर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस पडल्याने धरणांत बऱ्यापैकी पाण्याची आवक झाली आहे.

परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावरही पावसाच्या तुरळक सरी पडल्या आहेत.

Rain
Nashik Rain : मालेगाव, देवळा तालुक्यात जोरदार सरी

पूर्वेकडील उजनी धरणक्षेत्रात सर्वाधिक ६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. तर विसापूर, पवना, शेटफळ या धरणक्षेत्रात हलका पाऊस पडला. पूर्वेकडील बारामती तालुक्यातील उंडवडी येथे गुरुवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंत सर्वाधिक ३३.० मिलिमीटर, तर बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव भागांत हलक्या सरी बरसल्या.

Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप

इंदापुरातील इंदापूर येथे २५.३ मिलिमीटर, लोणी १८.५, काटी १६.८, तर बावडा, भिगवण, निमगाव, अंथुर्णी, सणसर, शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा भागात तुरळक सरी कोसळल्या. सासवड भागात ढगाळ वातावरण होते.

वेल्हा येथे ३३.५ मिलिमीटर

हवेलीतील भोसरी येथे १९.३ मिलिमीटर पाऊस पडला. खेड, चिंचवड भागात ढगाळ वातावरण होते. मुळशीतील पौड १२.८, घोटावडे १२.८ मिलिमीटर तर थेरगाव, माले, मुठे, पिरंगुटला तुरळक सरी पडल्या. भोरमधील नसरापूर, निगुडघर येथे तुरळक सरी पडल्या.

किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, भोर, भोलावडे भागात पावसाने उघडीप दिली. मावळमधील तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे भागातही हलक्या सरी पडल्या. वेल्हा येथे ३३.५ मिलिमीटर पाऊस पडला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com