Crop Loan Agrowon
ताज्या बातम्या

Crop Loan : लासलगाव समितीतर्फे यंदाही शेतीमाल तारण कर्ज योजना

काढलेला शेतीमाल एकाचवेळी बाजार समिती आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे २०२२-२३ या हंगामाकरिता शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

टीम ॲग्रोवन

नाशिक : निफाड तालुक्यात खरीप हंगामातील (Kharip Season) मका व सोयाबीन काढणीचे (Corn and Soybean Harvesting) काम सुरू झाले आहे. हा काढलेला शेतीमाल एकाचवेळी बाजार समिती आवारात विक्रीस आल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव बाजार समितीने (Lasalgaon APMC) दरवर्षीप्रमाणे २०२२-२३ या हंगामाकरिता शेतीमाल

तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यामार्फत १९९०-९१ पासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत बाजार समिती २०२२-२३ या हंगामाकरिता मका, सोयाबीन, हरभरा व गहू या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे.

त्यानुसार या योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरित्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, हरभरा व गहू हा शेतीमाल ज्यादिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल.

त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभूत दर यापैकी जे कमी असेल ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे,

असे समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, उपसभापती प्रीती बोरगुडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले.अशी असेल योजनेची कार्यपद्धती संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व सात-बारा उताऱ्यावरील मका, सोयाबीन, हरभरा व गव्हाचे लागवड क्षेत्र व उत्पादीत मालाचे प्रमाण ठरवुन

एकुण किंमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांचे मुदतीने ६ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या ६ महिन्यांकरिता ८ टक्के व त्यापुढील ६ महिन्यांकरिता १२ टक्के व्याज दराने आकारणी केली जाणार आहे. १८ महिन्यांनंतर सदर कर्जास मुदतवाढ मिळणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT