Agrowon Exhibition Agrowon
ताज्या बातम्या

Agrowon Exhibition : शेतीउपयोगी माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकरी भारावले

औरंगाबादमध्ये अॅग्रोवनमध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन चांगले आहे. शेतीसाठी आधुनिक यंत्रे येथे उपलब्ध आहेत.

Team Agrowon

औरंगाबाद ः ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला (Agrowon Agriculture Exhibition) दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१४) राज्यभरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतातील आधुनिक तंत्रज्ञानासह (Modern Agriculture Technology) ट्रॅक्टरचलित औजारे, सिंचन सुविधा, खते-बी बियाणे, फळबाग लागवड (Orchard Cultivation) तंत्रज्ञानासह विविध शेती उपयोगी माहितीचा स्त्रोत पाहून शेतकरीही भारावले.

औरंगाबादमध्ये अॅग्रोवनमध्ये आयोजित केलेले हे प्रदर्शन चांगले आहे. शेतीसाठी आधुनिक यंत्रे येथे उपलब्ध आहेत. नवनवीन तंत्राची मांडणी प्रदर्शनात भावली आहे. शेती करणाऱ्या प्रत्येकाने याचा अनुभव घेतला पाहिजे. मी शेतीच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी आलो होतो.

- प्रकाश मुकुंदराव कांदे, ता. अंबाजोगाई, जि. बीड (ह. मु. औरंगाबाद)

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे प्रदर्शन अतिशय उपयोगी आहे. प्रदर्शनात शेती, माती, यंत्रे तसेच इतर स्वरूपातील माहिती प्रत्येक दालनावर उपलब्ध असल्याचे जाणवले. आधुनिक पद्धतीने करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदेशीर तंत्रज्ञानाचा येथे भांडार उपलब्ध आहे.

- भरत अप्पाराव मरगीळ, मरगळवाडी, ता. जि. परभणी

प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही आठ शेतकरी एकत्र आलो आहोत. सर्वजण खरीप पिकांसह उसाची शेती करतो. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशा प्रकारची दालने असून त्यावर माहिती दिली जाते. पशुधनाबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे उपलब्ध असल्याचे दिसले. आम्ही सर्वांनी संपूर्ण प्रदर्शन पाहत माहिती घेतली. सर्व शेतकरी बंधूंनी आवर्जुन हे प्रदर्शन बघावे, अशा स्वरूपाचे आहे.

- साहेबराव म्हस्के, पिंपळगाव लांडगा, ता. जि. नगर

प्रदर्शनात मला प्रामुख्याने प्रदर्शनात ठिबक सिंचन, रोपवाटिका, फळबाग, यांत्रिकीकरणाच्या दालनांवर उपयोगी माहिती मिळाली. प्रदर्शनात पशुधन, आधुनिक शेतीसाठी लागणारी यंत्रे, तंत्रेही उपलब्ध आहेत. ‘अॅग्रोवन’ने भरवलेले हे प्रदर्शन बहुउपयोगी असे आहे.

- नाना श्रीमंत खंडागळे, कुकडगाव, ता. जि. बीड

मी प्रदर्शन पाहण्याकरिता तीन दिवस औरंगाबाद येथे मुक्कामासाठी आलो आहे. या प्रदर्शनातून शेती करण्याची ऊर्जा मिळते. नवे तंत्रज्ञान कळते. शेतीक्षेत्रातील नवे बदल कळतात.

-प्रमोद पुरुषोत्तम रत्नपारखी, अमरापूर, ता. चिखली जि. बुलडाणा

शेतीक्षेत्राची संपूर्ण माहिती घेण्यासाठी प्रदर्शन बघण्यासाठी आलो. भरपूर काही माहिती मिळत आहे. विश्वासराव पाटील यांचे विचार ऐकणे हाही एक भाग आहे. प्रदर्शनामध्ये फळबागांची माहिती घेतली.

- अविनाश देशमुख, जाफराबाद, ता. जालना

प्रदर्शनामध्ये जैविक शेतीचे मार्गदर्शन चांगले मिळाले. बियाणे, खते, औषधे, जैविक औषधे याची माहिती आम्हांला मिळाली. फळबागांबाबतची माहिती आम्हाला मिळाली. नवीन आणि प्रचलित तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

- पंढरीनाथ लांडगे, पिंपळगाव लांडगा, नगर

या प्रदर्शनात विविध भाजीपाल्याबद्दल, यांत्रिकरणाबद्दल भरपूर माहिती मिळाली. ट्रॅक्टरच्या विविध मॉडेलची माहिती घेतली. उत्पन्न वाढीच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेतली आणि ही माहिती आवडली. ‘ॲग्रोवन’ने चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबविला आहे.

- संतोष घाडगे, रा. चकलांबा, ता. गेवराई, जि. बीड

शेतीक्षेत्राशी संबंधित सर्व गोष्टी एका छताखाली आणल्याबद्दल ॲग्रोवनचे आभार. अतिशय सुंदर व्यवस्थापन करून मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. एकाच छताखाली सर्व माहिती मिळत आहे.

-प्रकाश डिवरे, अकोला

तीन एकर शेती आहे. त्यापैकी दोन एकरवर फळबाग लागवड आहे. फळपीक लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी खास ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास भेट दिली. सीताफळाच्या नवीन वाणांची, रोपाची माहिती तसेच फलोत्पादन, मधमाशाचे महत्त्व यावर सविस्तर माहिती मिळाली. त्याचा निश्चितच येत्या काळात उपयोग होणार आहे.

- अविनाश देशमुख, दहेगाव, ता.जाफराबाद, जि.जालना

माझी अकरा एकर शेती आहे. ऊस, बाजरी, गहू आदी पिके घेतो. प्रक्रिया उद्योग, कांदा लागवड तंत्रज्ञान माहिती जाणून घेण्यासाठी ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला भेट दिली. त्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली आहे. प्रदर्शनाचे आयोजन उत्तम पद्धतीने केले आहे.

- वैभव पाटील, चोपडा, जि.जळगाव.

साडे आठ एकर शेती आहे. कापूस, तूर, ऊस आदी पिकांची लागवड करत असतो. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातून ऊस लागवड, खत व्यवस्थापन तंत्रज्ञानाची मिळालेली माहिती अंत्यत उपयुक्त आहे. शेतीविषयक ज्ञान माहिती अद्ययावत होते. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी.

- संतोष घाडगे, चकलंबा, ता. गेवराई,जि.बीड.

दहा एकर शेतीमध्ये खरीप तसेच रब्बी हंगामी पिकासोबत सीताफळ, पेरू, बोर, जांभूळ, अंजीर आदी फळपिकांची लागवड आहे. विविध विषयावरील चर्चासत्र हे ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये आहेत. शून्य मशागत तंत्रज्ञान विषयावरील चर्चासत्रातून मला शेती करण्यासाठी दिशा मिळाली.

- मिलिंद काळे, जिंतूर, जि.परभणी

मजुरांच्या समस्येमुळे शेतीसाठी अडचणी येत आहेत. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनातून ट्रॅक्टरचलित मशागती तसेच फवारणीच्या यंत्राची माहिती मिळाली, यंत्र खरेदी करण्यासाठी संपर्क केला. लवकरच यंत्र खरेदी करणार आहोत.

- शाकिरखान पठाण, पैठण, जि. औरंगाबाद

प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी प्रेरक

‘अॅग्रोवन’द्वारे आयोजित हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी प्रेरक ठरलेले आहे. शनिवारी (ता. १४) या प्रदर्शनाला भेट दिली. अनेक प्रकारचे उपयुक्त स्टॅाल्स इथे पाहायला मिळाले. शेतकऱ्याचा शेतीविषयक दृष्टिकोन बदलण्याची ताकद या कृषी प्रदर्शनामध्ये आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातले शेतकरी इथे आले आहेत. नक्कीच या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना माहितीसह विविध प्रयोग दिशादर्शक ठरतील.

- रवींद्र जोगदंड, उपायुक्त,जीएसटी, औरंगाबाद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT