अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील शेतकरी (Farmer) कष्टाळू आहेत. पण, त्यांना शास्त्रशुध्द शेती (Agriculture) करण्यासाठी अधिक शहाणे करण्याची गरज आहे. उत्तम शेती करायची असेल तर उत्पादन खर्च मर्यादित ठेवून उत्पादनात वाढ करावी लागेल, त्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी लागेल. शेतकऱ्यांना ज्ञान, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे आदर्श धडे देण्याचा वसा घेतलेल्या ‘अॅग्रोवन’चे तुम्ही जिज्ञासू वाचक व्हा, असे आवाहन केंद्रीय असे उद्गगार केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) केले
औरंगाबादच्या चिकलठाणा एमआयडीसीमधील ‘कलाग्राम’ परिसरात ‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या चार दिवसीय राज्यव्यापी कृषी प्रदर्शनाचे काल (ता.१३) शानदार उद्घाटन करताना ते बोलत होते.
या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक कन्हैया अॅग्रो आहेत. तसेच बसवंत गार्डन असोसिएट पार्टनर आहेत.
आपल्या खुमासदार शैलीतील भाषणाने श्री.दानवे यांनी उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे फुलवले.
फलोत्पादन मंत्री श्री. भुमरे यांनी आपल्या भाषणात अॅग्रोवनवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ते म्हणाले, “मराठवाड्यात सकाळ दैनिकाला २३ वर्षे झाली तर अॅग्रोवनला १७ वर्षे झाली आहेत.राज्यात एकही जाणकार शेतकरी आता अॅग्रोवनपासून दूर नाही. मी स्वतः या दैनिकाचा वाचक आहे. कृषी विषयक माहिती देतानाच विविध उपक्रम राबविल्याने आणि दैनिकामधून सतत ज्ञानाची शिदोरी पुरविल्याने शेतकऱ्यांची प्रगती होते आहे. अॅग्रोवनच्या प्रदर्शनाचा राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम लाभ मिळतो आहे. मी स्वतः शेतकरी आहे. मंत्री म्हणून मी फलोत्पादन व रोहयोच्या योजनेतील अनेक अडथळे हटविले आहेत. त्यामुळेच शेततळी, अस्तरीकरण, पाणंद रस्ते अशा योजना सुटसुटीत करून आज लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असेही श्री. भुमरे म्हणाले.
श्री.चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितले की, शेती आणि मातीशी जोडलेले वृत्तपत्र असलेल्या अॅग्रोवनचे हे तिसरे कृषी प्रदर्शन औरंगाबादला होते आहे. शेतीमधील आव्हाने विविधांगी माहितीच्या माध्यमातून सुकर करीत राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम शेती करण्यासाठी अॅग्रोवन सुरू झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.