Agricultural Festival Agrowon
ताज्या बातम्या

Agricultural Festival, Nashik : आकर्षक पॅकिंग, प्रक्रियायुक्त उत्पादने आकर्षण

नाशिक येथे झालेल्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादनांचे आकर्षक ब्रँडिंग व प्रक्रियायुक्त उत्पादनांची मांडणी करून ग्राहकांचे लक्ष वेधले.

Team Agrowon

नाशिक : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडल्याचे स्थिती आहे. अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना शेतकरी संघर्ष करत आहे; मात्र शेतीमालाची विक्री करताना नव्या संधी ओळखून मार्केटिंग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक येथे झालेल्या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांनी उत्पादनांचे आकर्षक ब्रँडिंग व प्रक्रियायुक्त उत्पादनांची मांडणी करून ग्राहकांचे लक्ष वेधले. समारोपप्रसंगी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देत शेतकऱ्यांच्या विक्री कौशल्याचे कौतुक करत दाद दिली.

पाच दिवसीय प्रदर्शनात १.५ लाखांवर शेतकरी व ग्राहक यांनी भेट दिली. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी दिसून आली. या प्रदर्शनाला जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी भेटी देत तंत्रज्ञानाची पाहणी करत नवीन संकल्पना अवगत केल्या. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला थेट विक्री या ठिकाणी व्यासपीठ मिळाले नाशिकसह परिसरातून आलेल्या शेतकऱ्यांनी ग्राहकांकडून ग्राहकांनी शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दोन पैशांचा या प्रदर्शनात लाभ झाला.

प्रदर्शनात गहू, बाजरी, कांदा, स्ट्रॉबेरी, भुईमूग, भाजीपाला पांढरा, काळा, निळा व लाल ज्यामध्ये हातसडी, पॉलिश व सेंद्रिय तांदूळ, लाकडी घानी तेल, मध, सेंद्रिय गूळ, काकवी, मशरूम, नागली, मसाले, आयुर्वेदिक औषधे, बांबूपासून बनवलेल्या आकर्षक वस्तू, शेळीच्या दुधापासून औषधी साबण, रेडी-टू-कूक पद्धतीने भरीत, लोकरीच्या घोंगड्या, रेडी-टू-कूक आमटी व पुरण, खाकरा, कुरडया पापड्या यासह तयार भाजीपाला रोपे यांची खरेदी करण्यात आली.

राज्य शासनाच्या कृषीसह इतर संलग्न विभाग, खासगी कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रक्रिया उद्योजक, नर्सरी यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण शेतीमालाची मांडणी करण्यात आली होती. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, पेरू, विदेशी भाजीपाला, सीताफळ, पपई, यासह भाजीपाला व फुले, डाळ व अन्न धान्य यांचा समावेश होता. उत्पादक शेतकरी, पीक, वाण व त्याची वैशिष्ठ्ये यांची माहिती देण्यात आली. प्रदर्शनात कृषी विभागाच्या योजनांच्या माहितीचे फलक प्रदर्शित केले होते. महोत्सवात परिसंवाद, शेतीमाल खरेदीदार-विक्रेता संमेलन, पाककृती स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

खानदेशमधील भरीत भाकरी, खापराचे मांडे, डाळ बट्टी, झुणका भाकरी, कुळीथ शेंगोळे, थालीपीठ, सोलापूर ज्वारीचा चिवडा, आदिवासी भागातील नागली भाकरी, उडीद पिठले, कोकणातील पुडाचे घावन, मराठवाड्यातील हुलग्याचे सांडगे, ज्वारीचे आंबील अशा विविध पदार्थांचा ग्राहकांनी आस्वाद घेतला. त्यामुळे राज्यांतील खाद्यपदार्थ एकच ठिकाणी चाखायला मिळाले.

नागलीपासून विविध उत्पादने विकसित केली आहेत. ग्राहकांपर्यंत उत्पादनाची माहिती पोहोचली त्यामुळे आत्मविश्वास वाढला. आरोग्यवर्धक उत्पादनाचे ब्रँडिंग व नावीन्यता ग्राहकांना आवडली.

- वर्षा सोनवणे-पाटील, अरुनिका फूड्स

२०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शेतकरी, शेतकरी गटांना व्यावसायिक पद्धतीने व्यासपीठ मिळवून दिल्याने ५ कोटींवर उलाढाल झाली.

- मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सोयाबीन खरेदीची मुदत निम्मी संपली मात्र २ टक्केही खरेदी नाही; आतापर्यंत केवळ २४ हजार टनांची खरेदी पूर्ण

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी नरमाई ; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर ?

Farmer Producer Company : नवअनंत शेतकरी कंपनीची वाटचाल आशादायी

Maharashtra Election 2024 : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला तारणार?

Hawaman Andaj : थंडीमुळे राज्याला हुडहुडी; राज्याच्या बहुतांशी भागातील कमान तापमानात घट कायम

SCROLL FOR NEXT